TRENDING:

आधी फडणवीस आता सुनेत्रा पवारांचा अचानक दिल्ली दौरा, PM मोदी-शाहांची भेट घेणार, हालचालींना वेग

Last Updated:

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली मृत्यूनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या हालचालींना वेग आला आहे. आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली मृत्यूनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या हालचालींना वेग आला आहे. दोन्ही गटांना एकत्र करण्यासाठी शरद पवार गटाकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. बैठकांचं सत्र घेतलं जात आहे. सोमवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांची बैठक पार पडली. तिन्ही नेत्यांमध्ये तब्बल ७० मिनिटं बैठक चालली. या बैठकीनंतर आता सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर जात आहेत.
News18
News18
advertisement

सुनेत्रा पवार आज मुंबईत येऊन मंत्रालयात हजार राहणार आहेत. तिथे उपमुख्यमंत्री पदाचा त्या पदभार स्विकारणार आहेत. तसेच मंत्रिमंडळाच्या बैठकीला देखील हजेरी लावणार आहेत. मुंबईतील कामं उरकल्यानंतर आजच सुनेत्रा पवार दिल्लीसाठी रवाना होणार आहेत. त्या दिल्लीतील महाराष्ट्र सदनात राहणार आहेत. यानंतर उद्या त्या दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत.

advertisement

या भेटीत सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबद्दल चर्चा करणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर गेले होते. यानंतर लगेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. यामुळे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? की दोन्ही गटाचं स्वतंत्र अस्तित्व ठेवून एनडीएला पाठिंबा देणार? याबाबत चर्चा करण्यासाठी सुनेत्रा पवार दिल्लीला गेल्याची माहिती आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आल्याचे भाव तेजीत, केळी आणि डाळिंबाला आज काय मिळाला दर? इथं चेक करा
सर्व पहा

खरं तर, मागील काही दिवसांपासून बारामतीत पवार कुटुंबीयांच्या बैठकांचा सिलसिला सुरू होता. काल अचानक शरद पवारांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना व्हायरल इन्फेक्शन झाल्याची माहिती असून त्यांना खोकल्याचा त्रास जाणवू लागला आहे. यामुळे त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनीक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. अशात सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर जात असताना विविध तर्क वितर्क लढवले जात आहेत.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आधी फडणवीस आता सुनेत्रा पवारांचा अचानक दिल्ली दौरा, PM मोदी-शाहांची भेट घेणार, हालचालींना वेग
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल