TRENDING:

सरकारी जागेवर १५०० चौरस फुटांपर्यंतचे अतिक्रमण नियमाने वैध, सरकारचा मोठा निर्णय

Last Updated:

महसूल विभागाने २०११ पूर्वीची सरकारी जागेवरील १५०० चौरस फुटापर्यंतची अतिक्रमणे नियमानुकूल करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, सरकारी जागेवर 1500 चौ.फुटांपर्यंत असलेले अतिक्रमण नियमबद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. २०११ पूर्वीची सरकारी जागेवरील १५०० चौरस फुटापर्यंतची अतिक्रमणे नियमानुकूल होणार आहेत.
चंद्रशेखर बावनकुळे-देवेंद्र फडणवीस
चंद्रशेखर बावनकुळे-देवेंद्र फडणवीस
advertisement

१५०० चौरस फुटापर्यंतची अतिक्रमणे नियमानुकूल

निवडणुकीत दिलेल्या वचनानुसार, राज्यातील जनतेला त्यांच्या हक्काचे घर मिळावे व घरबांधणीसाठी प्लॉट उपलब्ध व्हावा, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेमुळे सुमारे 15 लाख कुटुंबांना लाभ होणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

यापूर्वी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घर मिळत होते, मात्र आता सर्वसामान्य नागरिकांसाठी पट्टेवाटपाचा निर्णय घेतला असून, पट्टा मिळाल्यानंतर केवळ 1000 रुपयांत नोंदणी (रजिस्ट्रेशन) करण्याची सोयही सरकारने केली असल्याचे महसूलमंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

advertisement

महसूलमंत्री बावनकुळे काय म्हणाले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महसूल विभागाने २०११ पूर्वीची सरकारी जागेवरील १५०० चौरस फुटापर्यंतची अतिक्रमणे नियमानुकूल करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महायुतीने निवडणुकीवेळी महाराष्ट्रातील जनतेला दिलेल्या सर्वांसाठी घरे या वचनाची वचनपूर्ती करणारा हा निर्णय आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

शेतकऱ्यांची २८००० प्रलंबित प्रकरणे निकालात काढण्यासाठी ५७ लवादांची नियुक्ती

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गुडघ्याच्या वेदनांवर श्रद्धेचा उपाय! पुण्यातलं गुडघेमोडी माता मंदिर, देशभरातून यतात भाविक, Video
सर्व पहा

राज्यातील राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांमुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांसाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. प्रलंबिक दावे जलदगतीने निकाली काढण्यासाठी राज्यात तब्बल ५७ स्वतंत्र लवाद (अर्बिट्रेशन ट्रिब्युनल) स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे सुमारे २८ हजार प्रलंबित प्रकरणांना गती मिळणार असून हजारो शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सरकारी जागेवर १५०० चौरस फुटांपर्यंतचे अतिक्रमण नियमाने वैध, सरकारचा मोठा निर्णय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल