TRENDING:

गुडघ्याच्या वेदनांवर श्रद्धेचा उपाय! पुण्यातलं गुडघेमोडी माता मंदिर, देशभरातून यतात भाविक, Video

Last Updated:

Pune News: गुडघ्यांच्या वेदनांपासून आराम मिळावा या भावनेने अनेक जण देवीसमोर नवस बोलतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुणे शहराला ऐतिहासिक आणि धार्मिक वारशाची समृद्ध परंपरा लाभली आहे. शहरातील विविध भागांत अनेक प्राचीन मंदिरे आजही भक्तांसाठी श्रद्धास्थान ठरली आहेत. त्यापैकीच एक महत्त्वाचे मंदिर म्हणजे गुडघे मोडी माता मंदिर. पुण्यातील शुक्रवार पेठ परिसरात वसलेले हे मंदिर गुडघ्यांच्या वेदनांपासून आराम मिळतो, या श्रद्धेमुळे विशेष प्रसिद्ध आहे. स्थानिक नागरिक तसेच दूरदूरवरून येणारे भक्त देवीच्या दर्शनासाठी येथे मोठ्या संख्येने येताना दिसतात.
advertisement

स्थानिक परंपरेनुसार या मंदिराचा इतिहास सुमारे 350 वर्षांपूर्वीचा असल्याचे सांगितले जाते. तर पेशवाईच्या काळात मंदिर बांधल्याचे स्थानिक सांगतात. काळाच्या ओघात मंदिराने केवळ धार्मिकच नव्हे तर सांस्कृतिक दृष्ट्याही एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. पुण्याच्या जुन्या भागातील धार्मिक परंपरा जपणाऱ्या मंदिरांमध्ये या मंदिराचा समावेश केला जातो.

अजबच! महाराष्ट्रात इथं आहे ‘नवरा-नवरी’चं मंदिर, नवसासाठी होते गर्दी, पण 'ते' गूढ आजही कायम, Video

advertisement

मंदिराबाबत अनेक आख्यायिका प्रचलित आहेत. स्थानिकांच्या मते हे मंदिर शिवकालीन असल्याचे सांगितले जाते. तसेच एक आख्यायिका देखील सांगितली जाते की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी येथे भेट दिली होती आणि देवीचे दर्शन घेतले होते. त्या वेळी त्यांना झालेल्या त्रासातून आराम मिळाला. जरी या गोष्टी ऐतिहासिकदृष्ट्या सिद्ध नसल्या तरी या कथा मंदिराच्या परंपरेचा भाग म्हणून सांगितल्या जातात.

advertisement

View More

या मंदिरातील देवीची मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण मानली जाते. देवीची मूर्ती तांदळाच्या स्वरूपात असल्याचे सांगितले जाते, जे भक्तांसाठी आकर्षणाचा विषय ठरते. दररोज सकाळ-संध्याकाळ देवीची नियमित पूजा आणि आरती केली जाते. तसेच नवरात्र, चैत्रोत्सव यांसारख्या सणांच्या काळात येथे विशेष कार्यक्रम आणि धार्मिक विधी आयोजित केले जातात.

महाराष्ट्राच्या विविध भागांमधून तसेच इतर राज्यांतूनही अनेक भक्त येथे येऊन दर्शन घेतात. गुडघ्यांच्या वेदनांपासून आराम मिळावा या भावनेने अनेक जण देवीसमोर नवस बोलतात. काही भक्तांना श्रद्धेने अनुभवही आल्याचे ते सांगतात. मंदिराशी संबंधित माहिती देताना स्थानिक नागरिक विशाल जुन्नरकर यांनी सांगितले की, अनेक वर्षांपासून लोक येथे श्रद्धेने येत असून मंदिराची परंपरा आजही कायम ठेवली जात आहे.

advertisement

इतिहास, श्रद्धा आणि लोकविश्वास यांचा संगम असलेले गुडघे मोडी माता मंदिर हे पुण्याच्या सांस्कृतिक वारशातील एक वेगळे आणि महत्त्वाचे धार्मिक स्थळ म्हणून ओळखले जाते. शहराच्या जुन्या भागातील धार्मिक जीवन आणि लोकपरंपरा समजून घेण्यासाठी हे मंदिर एक महत्त्वाचे मानले जात आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गुडघ्याच्या वेदनांवर श्रद्धेचा उपाय! पुण्यातलं गुडघेमोडी माता मंदिर, देशभरातून यतात भाविक, Video
सर्व पहा

(सूचना: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

advertisement

मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
गुडघ्याच्या वेदनांवर श्रद्धेचा उपाय! पुण्यातलं गुडघेमोडी माता मंदिर, देशभरातून यतात भाविक, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल