विधन परिषदेत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटले की, मागील काही काळात महापुरुषांचा अपमान करण्यात येत आहे. प्रशांत कोरटकर ही नागपूरमधील व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांबाबत काहीही बोलते. अभिनेता राहुल सोलापूरकर ही बोलतो. प्रशांत कोरटकरला जेलमध्ये टाकणार की नाही, कोरटकर हा कोणाचा कार्यकर्ता आहे असा सवाल दानवे यांनी केला.
advertisement
विरोधकांच्या या आक्षेपाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, प्रशांत कोरटकर हा चिल्लर माणूस आहे. त्याला सोडणार नाही. पण, तुम्ही विरोधक जितेंद्र आव्हाडचा निषेध कधी करणार, रेकोर्डवर भाषण आहे, ठाराविक भूमिका तु्म्हाला घेता येणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढे म्हटले की, त्याच्याही पलिकडे जाऊन सांगतो की, पंडित नेहरू यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये शिवाजी महाराजांबद्दल जे लिहिलं , त्याचं निषेध करणार का असा सवाल त्यांनी केला. तुम्ही नेहरूंचा धिक्कार करणार का, असा सवालही मुख्यमंत्र्यांनी केला. सभागृहात गदारोळ झाल्याने कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.