एका मताचं महत्त्व काय असतं, हे धाराशिवमधील पंचायत समिती निवडणुकीतून समोर आलं आहे. ढोकी पंचायत समिती गटातून ठाकरे गटाचे अमर समुद्रे अवघ्या एक मतांनी विजयी झाले आहे. अमर समुद्रे यांना 3187 मतं मिळाली तर भाजपाचे निहाल काजी यांना 3186 मतं मिळाली आहे. या ठिकाणी अमर समुद्रे आणि निहाल काझी यांच्यामध्ये थेट लढत होती. मतमोजणीपासून दोन्ही नेत्यांमध्ये काँटे की टक्कर सुरू होती. अखेरीस शेवटच्या फेरीत अमर समुद्रे हे १ मत घेऊन विजयी झाले. या विजयानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
advertisement
तानाजी सावंत यांचा पुतण्या धनंजय सावंत विजयी
तर दुसरीकडे, धाराशिवच्या परंडा विधानसभा मतदारसंघात जवळा जिल्हा परिषद निवडणूक यंदा चांगलीच गाजली. राज्याचे माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना त्यांचेच पुतणे धनंजय सावंत यांनी थेट आव्हान दिलं होतं. धनंजय सावंत याांनी सेनेत बंडखोरी करून स्वबळावर निवडणूक लढवली होती. अखेरीस मतमोजणीत जवळा जिल्हा परिषद गटातून धनंजय सावंत विजयी झाले आहे. 2443 मतांनी सावंत विजयी झाले आहे.
तानाजी सावंत यांचा परंडा हा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, घरातीलच व्यक्तीने बंडखोरी करून काकांची डोकेदुखी वाढवली होती. धनंजय सावंत यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. स्वतः धनंजय सावंत हे निजाम जवळा गटातून जिल्हा परिषदेची निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला होता. या निवडणुकीत धनंजय सावंत यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पुतण्या धनंजय सावंत यांनीच आव्हान दिल्यामुळे तानाजी सावंत यांची प्रतिष्ठपणाला लागली होती.
