शिवसेनेकडून भारतीय जनता पार्टीला अडीच अडीच वर्ष अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपद असा फॉर्म्युला देण्यात आला असून सरनाईक यांनी भाजप आमदार राणा पाटील यांच्याशी चर्चा केली आहे. परंतु यावर दोन्हीही पक्षाचे नेते निर्णय घेणार असून येत्या दोन दिवसात यावर निर्णय होईल असेही सरनाईक म्हणाले आहेत.
सरनाईकांनी दिलेला फॉर्म्युला भाजप स्वीकारणार का?
माजी मंत्री तानाजी सावंत यांनी अध्यक्षपदावर दावा सांगितल्यावर जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात वाद सुरू झाला असून आता सरनाईक यांनी दिलेला फॉर्म्युला भाजप स्वीकारते का? त्यावरच धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषदेत युतीचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
advertisement
महायुतीला बहुमत पण सदस्य सहलीवर
धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले आहे. मात्र, सत्तास्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरु असतानाच आता त्यामध्ये मोठा ट्विस्ट आला आहे. महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष सदस्य कोकणात सहलीवर गेले आहेत तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सदस्य पुण्यात सहलीवर असल्याचे समजते.
धाराशिव जिल्हा परिषदेचा निकाल काय?
धाराशिव जिल्हा परिषदेत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. १९ जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला १५ तर राष्ट्रवादी काँग्रेसला ६ जागांवर विजय मिळाला. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला केवळ सात जागांवर समाधान मानावे लागले आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एकही जागा मिळाली नाही. काँग्रेसला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले. धाराशिवमध्ये समाजवादी पार्टीच्या उमेदवाराने तुळजापूरच्या मंगरूळ येथे खाते उघडले.
