TRENDING:

ज्यांना अजितदादांचा शेवटचा कॉल, त्या आमदाराच्या पत्नीचं काय झालं? धाराशिवचा निकाल लागला

Last Updated:

Dharashiv ZP Election Results: अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या एक तास अगोदर त्यांनी राणा जगजीतसिंह पाटील यांना फोन केला होता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
धाराशिव : धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या तेर गटात भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी विजय मिळवला. त्यांनी राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांचा पराभव केला. धाराशिव जिल्ह्याचे लक्ष तेर जिल्हा परिषद गटाकडे लागून राहिले होते.
अर्चना पाटील विरुद्ध सक्षणा सलगर
अर्चना पाटील विरुद्ध सक्षणा सलगर
advertisement

अर्चना पाटील यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी दिल्यानंतर राणा जगजीतसिंह पाटील यांच्यावर घराणेशाहीचा आरोप झाला. मतदार, जिल्ह्यातील नागरिक, विविध माध्यम संस्था, समाजमाध्यमे यावरून अर्चना पाटील यांच्या उमेदवारीवर घराणेशाहीचा शिक्का मारण्यात आला. त्यानंतर अर्चना पाटील यांनी निवडणुकीतून माघारी घेण्याची तयारी दाखवली. परंतु अखेरच्या क्षणी भारतीय जनता पक्षाने त्यांचा अर्ज कायम ठेवण्यास सांगितले. पक्षाचा आदेश मानून अर्चना पाटील यांनी निवडणूक लढवली आणि जिंकलीही!

advertisement

अजित पवार यांचा शेवटचा कॉल राणा जगजीतसिंह पाटलांना!

अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या एक तास अगोदर त्यांनी राणा जगजीतसिंह पाटील यांना फोन केला होता. मतदारसंघातील कुठल्याशा कामानिमित्त राणा जगतीतसिंह पाटील यांच्या निरोपानंतर अजित पवार यांनी त्यांना फोन केला. २ मिनिटे त्यांच्यात बोलणे झाले. पुढच्या तासाभरात बारामतीला पोहोचणार असल्याचेही त्यांनी राणा जगजीतसिंह पाटील यांना सांगितले. मात्र विमानतळावर लँड होण्याआधी त्यांच्या विमानाला अपघात झाला.

advertisement

राणा जगजीतसिंह पाटील हे पवार कुटुंबाचे नातेवाईक आहेत. सुनेत्रा पवार या राणा जगजीतसिंह पाटील यांच्या सख्ख्या आत्या. राणा पाटील कुटुंब आधी राष्ट्रवादीतच होते, राज्यात भाजप सत्तेत आल्यावर पाटील कुटुंबाने भाजपमध्ये प्रवेश केला.

सक्षणा सलगर पराभूत

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मानव संस्कृतीचे दुर्मिळ पुरावे, डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व विभागात अनोखा ठेवा
सर्व पहा

राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर या गत जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी झाल्या. यंदाही विजयी गुलाल उधळण्याच्या इराद्याने त्यांनी निवडणूक लढवली. परंतु यावेळी त्यांच्यासमोर अर्चना पाटील यांचे तुल्यबल आव्हान होते. भारतीय जनता पक्ष विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) अशा थेट लढतीत सक्षणा सलगर यांना पराभव धक्का सहन करावा लागला. संपूर्ण राज्यभरात जाऊन पक्षाची ध्येय धोरणे पोहोचण्याचे यशस्वी काम सक्षणा सलगर यांनी आतापर्यंत करतात. राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी घणाघाती भाषणेही त्यांनी केली. परंतु मतदारसंघातील जनतेने मात्र सक्षणा सलगर यांना नाकारले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ज्यांना अजितदादांचा शेवटचा कॉल, त्या आमदाराच्या पत्नीचं काय झालं? धाराशिवचा निकाल लागला
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल