TRENDING:

'चु...आहे तो', नितेश राणेंबद्दल 'तो' प्रश्न विचारताच संजय राऊतांची जीभ पुन्हा घसरली

Last Updated:

नितेश राणे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना पुन्हा एकदा संजय राऊत यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
धुळे, दीपक बोरसे, प्रतिनिधी : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. मात्र आता यावरून श्रेयवादाची लढाईल सुरू झाली आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी कधीही प्रयत्न केले नाहीत असं वक्तव्य भाजप नेते नितेश राणे यांनी केलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदर संजय राऊत यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. यावरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
News18
News18
advertisement

नेमकं काय म्हणाले संजय राऊत? 

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी कधीही प्रयत्न केले नाहीत, असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं होतं. याबाबत संजय राऊत यांना विचारलं असता, नितेश राणे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना त्यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. 'चु.... आहे तो' असं म्हणत संजय राऊत तिथून उठून निघून गेले.  मात्र त्यावर बोलणं त्यांनी टाळलं आहे. संजय राऊत यांच्या या वक्तव्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

advertisement

श्रेयवादाची लढाई

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. याची घोषणा होताच संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे. मराठी भाषिकांकडून या निर्णयाचं जोरदार स्वागत करण्यात आलं. मात्र आता यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप आणि श्रेयवादाची लाढाई सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/धुळे/
'चु...आहे तो', नितेश राणेंबद्दल 'तो' प्रश्न विचारताच संजय राऊतांची जीभ पुन्हा घसरली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल