TRENDING:

Ajit Pawar: अजित पवारांनी काय कमावलं? बारामतीमध्ये सहयोगी निवास्थानावर 'त्या' व्यक्तीला पाहून सगळेच गहिवरले, VIDEO

Last Updated:

राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या शपथविधी घेतल्यानंतर बारामतीमध्ये सहयोग या निवासस्थानी उपस्थित होत्या

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बारामती : कामाचा माणूस अशी ख्याती असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. अजितदादांना ठिकठिकाणी श्रद्धांजली वाहिली जात आहे. राष्ट्रवादीच्या कार्यालयात त्यांच्या अस्थी कलश दर्शनासाठी ठेवण्यात येत आहे. अशातच बारामतीत अजितदादांनी काय कमावलं, याचा एक भावुक व्हिडीओ बारामतीतून समोर आला आहे.
News18
News18
advertisement

राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या शपथविधी घेतल्यानंतर बारामतीमध्ये सहयोग या निवासस्थानी उपस्थित होत्या. यावेळी सांत्वन भेटीसाठी राज्यभरातून अजितदादांवर प्रेम करणारे कार्यकर्ते पदाधिकारी भेटीसाठी पोहोचले आहे.  या ठिकाणी अजित पवार यांचे कनिष्ठ सुपुत्र जय पवार, अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार, शर्मिला पवार, नीताताई पाटील, विजया पाटील, राजेंद्र पवार उपस्थित आहेत.

advertisement

यावेळी मोठ्या संख्येनं अजितदादांवर प्रेम करणारे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि बारामतीकर आले होते. या गर्दीत एक दिव्यांग व्यक्ती आली होती. पायाने दिव्यांग असलेल्या व्यक्तीला पाहून उपस्थितीत कार्यकर्ते भावुक झाले होते. अजितदादांनी काय कमावलं असेल तर ही माणसं कमावली, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

अजित पवार यांच्या अस्थी बाणगंगेत विसर्जित  

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कृषी मार्केटमध्ये मोठी उलथापालथ, केळी आणि कांद्याला कवडीमोल भाव, लिंबाची काय स्थिती?
सर्व पहा

दरम्यान,  राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थींचे विसर्जन वाळकेश्वर येथील बाणगंगा इथं अस्थी विसर्जन करण्यात आलं. राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये अस्थी विसर्जन करण्यात येणार आहे. मुंबईत प्रथम अस्थी विसर्जन करण्यात आलं. यावेळी आमदार सना मलिक, माजी आमदार जिशान सिद्दिकी, मुंबईतील सर्व जिल्हा अध्यक्ष आणि कार्य अध्यक्ष शिवाजीराव नलावडे, सिद्धार्थ कांबळे या वेळी उपस्थित होते. या प्रसंगी राष्ट्रवादीचे मुंबई प्रदेशचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ajit Pawar: अजित पवारांनी काय कमावलं? बारामतीमध्ये सहयोगी निवास्थानावर 'त्या' व्यक्तीला पाहून सगळेच गहिवरले, VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल