TRENDING:

Supriya Sule : शरद पवारांना मुलीला मुख्यमंत्री कराचंय का? सुप्रिया सुळेंचं 'कभी हाँ कभी ना'

Last Updated:

संभाजीनगरच्या सभेतून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवारांवर घणाघाती टीका केली. शरद पवारांना मुलीला मुख्यमंत्री बनवायचं आहे, असं अमित शाह म्हणाले. अमित शाह यांच्या या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
वैभव सोनवणे, प्रतिनिधी
शरद पवारांना मुलीला मुख्यमंत्री कराचंय का? सुप्रिया सुळेंचं 'कभी हाँ कभी ना'
शरद पवारांना मुलीला मुख्यमंत्री कराचंय का? सुप्रिया सुळेंचं 'कभी हाँ कभी ना'
advertisement

पुणे : संभाजीनगरच्या सभेतून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवारांवर घणाघाती टीका केली. शरद पवारांना 50 वर्ष महाराष्ट्राच्या जनतेने सहन केलं, मागची 5 दशकं महाराष्ट्राची जनता शरद पवारांचं ओझं वाहत आहे, अशी टीका अमित शाह यांनी केली. अमित शाह यांच्या या टीकेला सुप्रिया सुळेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'लोकशाहीमध्ये विरोधक दिलदार असला पाहिजे, अमित शाह यांनी जरूर आरोप करावे. त्यांनी विधानभवनातील मारामारी, गोळीबार, रस्त्यावरच्या मारामारी, ड्रग्स यावरही बोलायला हवं,' असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

advertisement

शरद पवारांना मुलीला मुख्यमंत्री बनवायचं आहे अशी टीका अमित शाह यांनी केली, यावर सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारण्यात आला. मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे किंवा नाही, यावर सुप्रिया सुळेंचं हा भी नहीं, ना भी नहीं, असं उत्तर दिलं. आता उन्ह पडलंय, दोन तासानंतर पाऊस पडणार म्हणून छत्री उघडायची का नाही, हे आधीच कसं ठरवणार? असं सूचक विधान सुप्रिया सुळेंनी केलं. मी बारामती लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट मागितलं आहे. मुख्यमंत्रीपदावर बसणारी व्यक्ती हलकी नको, त्या पदाला लायक व्यक्ती पाहिजे, त्यामुळे ऑक्टोबरमध्ये महाविकासआघाडीची सत्ता येईल, असं मला वाटतं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

advertisement

'आम्हाला भ्रष्टाचारातून मुक्ती दिली त्याबद्दल मी प्रांजळपणे आभार मानते. एनसीपीला नॅचलरी करप्ट पार्टी म्हणायचे. भाजपमध्ये असं आहे का जिथे फॅमिली लढत नाहीये? आपला तो बबड्या, दुसऱ्याचं ते कारटं. आमच्याबद्दल आम्ही पारदर्शकपणे सांगू शकतो,' असं टोला सुप्रिया सुळेंनी भाजपला लगावला.

पक्षात-पार्टीत फूट नाही

पक्षात फूट नाही, हा पक्ष शरद पवारांचा आहे, तेच अध्यक्ष आहेत. अजून कोर्ट केस चालू आहे. चुकीच्या पद्धतीने पवार साहेबांवर अन्याय झाला आहे. पक्ष फुटलेला नाही, चुकीच्या पद्धतीने त्यांच्याकडून पक्ष काढून घेतला आहे. आमचं 130 लोकांचं कुटुंब आहे, एखाद्या व्यक्तीने स्वत:चं वेगळं मत मांडलं म्हणजे कुटुंब फुटलं असं नाही. नातं तोडणं सोपं आहे, जोडून ठेवणं अवघड आहे. माझे मनभेद कुणाशीच नाही, भाजपशीही नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कृषी मार्केटमध्ये मोठी उलथापालथ, केळी आणि कांद्याला कवडीमोल भाव, लिंबाची काय स्थिती?
सर्व पहा

मी एखाद्याला पाठिंबा देते, तो पूर्णपणे देते. कोर्टात जायला मला कमीपणा वाटत नाही. छगन भुजबळ जेलमध्ये असताना त्यांना भेटायला गेलेली मी एकटी होते. आमचे मतभेद असूदेत मनभेद नाहीत. आमच्यावर संस्कार आहेत, त्यामुळे आम्ही संयमीपणे भूमिका मांडतो, आमच्या कार्यकर्त्यांमध्ये अजिबात संभ्रम नाही, असं सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Supriya Sule : शरद पवारांना मुलीला मुख्यमंत्री कराचंय का? सुप्रिया सुळेंचं 'कभी हाँ कभी ना'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल