यावेळी या फरशीसोबत बापलेक दोघंही खाली गेले आणि भुयारातून चार फूट अंतरावर असलेल्या विहिरीतच निघाले. त्यानंतर एकच आक्रोश झाला. लोकांनी धाव घेत मुलगी पलकला 15 मिनिटांत इथून बाहेर काढलं. मात्र, विहिरीला जाळी असल्याने ती तोडण्यासाठी आणि तिच्या वडिलांना बाहेर काढण्यासाठी तब्बल दीड तास लागला. अग्रवाल यांना रात्री साडेदहा वाजता बाहेर काढण्यात यश आलं.
advertisement
Weather Update : राज्याच्या या भागांमध्ये आज जोरदार पाऊस, हवामान विभागाने दिला सतर्कतेचा इशारा
योगेश अग्रवाल हे पती-पत्नी आणि मुलीसह साई मंदिरात रात्री उशिरा दर्शनासाठी आले होते. मात्र, मंदिराचा ओटा आतून पोखरलेला होता. त्यामुळे, ते ज्या फरशीवर उभे होते, त्या फरशीच्या खाली पोकळी निर्माण झाली होती. याच कारणामुळे ते तिथे उभा राहातच फरशी जमिनीत गेली आणि तेदेखील फरशीसह भुयारात कोसळले. ते भुयार थेट विहिरीसोबत जोडलेलं होतं. त्यामुळे इथून ते विहिरीत जाऊन कोसळले.
सुदैवाने एरवी पाणी असलेली ही विहिर यावेळी कोरडी होती. सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत झटाले यांचे अथक प्रयत्न आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी मिळून अग्रवाल यांना सुखरुप बाहेर काढलं. मात्र, घटनेत उंचावरून पडल्याने अग्रवाल यांचा पाय मोडला आहे.