TRENDING:

Weather Alert: जे नको तेच घडतंय, 2027 हे वर्ष धोक्याचं, तज्ज्ञांनी व्यक्त केलेली भीती खरी होणार?

Last Updated:

2024-25 जगातील सर्वात उष्ण वर्ष ठरलं असून, जीपी शर्मा यांच्या मते 2027 मध्ये उष्णतेचा ब्लास्ट होईल. आर्क्टिकमध्ये बर्फ वितळतोय, मधमाश्या आक्रमक झाल्या आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
निसर्गाच्या लहरीपणाचा फटका आता आपल्याला थेट बसू लागला आहे. पृथ्वीचा ताप इतका वाढत चाललंय की, आता घराबाहेर पडतानाही विचार करण्याची वेळ आली आहे. गेल्या ११ वर्षांचा आढावा घेतला, तर धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. 2024-25 हे वर्ष आतापर्यंतचं जगातील सर्वात उष्ण वर्ष म्हणून नोंदवलं गेलं. पण ही तर फक्त सुरुवात आहे; शास्त्रज्ञांच्या मते, 2027 मध्ये उष्णतेचा असा काही 'ब्लास्ट' होईल की 2024-25 चाही सर्व रेकॉर्ड मोडले जाणार आहेत.
News18
News18
advertisement

फ्रीज आणि एसी ठरतात मुख्य कारण

स्कायमेटचे हवामान तज्ज्ञ एयर वाइस मार्शल जीपी शर्मा यांच्या मते,  आपण सुखसोयींसाठी वापरत असलेले फ्रीज आणि एसी आपल्याला थंडावा देत असले, तरी ते पृथ्वीला मात्र भाजून काढत आहेत. पूर्वी फ्रीजमधून निघणारा 'क्लोरोफ्लोरोकार्बन ओझोनचा थर कुरतडत होता. आता त्याची जागा हायड्रोफ्लोरोकार्बनने घेतली असली, तरी धोका टळलेला नाही. उपकरणांच्या देखभाल दुरुस्तीत होणारी गळती आणि उत्सर्जित होणारे वायू उष्णतेला वातावरणातच कैद करून ठेवत आहेत, ज्यामुळे शहरांचं तापमान एखाद्या भट्टीसारखं वाढू लागलं आहे.

advertisement

बर्फ वितळतोय अन् उष्णता शोषली जातेय!

सर्वात मोठी धोक्याची घंटा आर्क्टिक प्रदेशातून वाजत आहे. २०५० पर्यंत रशिया, कॅनडा आणि स्कॅन्डिनेव्हियन देशांमधील तापमान चक्क ३.७६ अंशांनी वाढण्याची भीती आहे. इथला बर्फ वेगाने वितळल्यामुळे एक भयानक दुष्टचक्र सुरू झालंय. पूर्वी बर्फ सूर्यप्रकाश परावर्तित करायचा, पण आता उघडी पडलेली जमीन हा सूर्यप्रकाश शोषून घेत आहे. परिणामी, जमीन अधिक गरम होऊन उरलेला बर्फही वेगाने संपवत आहे.

advertisement

निसर्गचक्र कोलमडलं

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उचलली लेखणी, पुण्यात 'हे' पहिल्यांदाच घडतंय, Video
सर्व पहा

जीपी शर्मा यांच्या मते, ग्लोबल वॉर्मिंगचा हा विळखा इतका घट्ट झालाय की, मुक्या जिवांच्या वागणुकीतही बदल झाले आहेत. शास्त्रज्ञांना असं आढळलंय की, वाढत्या उष्णतेमुळे मधमाश्या आता पूर्वीपेक्षा अधिक आक्रमक आणि अस्वस्थ झाल्या आहेत. मागच्या काही काळापासून मधमाशांचे हल्ले देखील वाढले आहेत. कधीही न पाहिलेला पावसाळा, वेळेआधीच येणारा उन्हाळा आणि हिवाळ्यातील कडाका कमी होणं, ही हवामान बदलाची स्पष्ट लक्षणं आहेत. वाढतं काँक्रिटीकरण आणि झाडांची सर्रास होणारी कत्तल थांबवली नाही, तर आगामी २०२७ हे वर्ष मानवासाठी मोठी कसोटी ठरणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Weather Alert: जे नको तेच घडतंय, 2027 हे वर्ष धोक्याचं, तज्ज्ञांनी व्यक्त केलेली भीती खरी होणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल