समोर आलेल्या माहितीनुसार, हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांची गाडी अडवून गाडीची तोडफोड करत मस्के यांना मारहाण झाल्याची घटना घडली होती. तीन ते चार अज्ञात व्यक्तींनी ही मारहाण केली होती. यामध्ये डॉ. दिलीप मस्के यांना दुखापत झाली आहे. कळमनुरी ते हिंगोली रोडवरील लासीना फाटाजवळ रात्री एक वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगितले. जखमी डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हिंगोली शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले होते.
advertisement
सहानुभूती मिळण्यासाठी रचला बनाव
त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरील परिस्थितीजन्य पुरावा, तांत्रिक पुरावा याचे बारकाईने निरीक्षण केले. पोलिसांनी केलेल्या सखोल तपासाअंती निष्पन्न झाले आहे की उमेदवाराला सहानुभूती मिळण्यासाठी हा हल्ल्याचा बनाव केला गेला. मतदानाच्या तोंडावर स्वतः चीच गाडी फोडण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी वंचितचे पराभूत उमेदवार डॉ. दिलीप मस्के व त्यांच्या दोन सहकाऱ्यांना अटक केली आहे.
अन् बिंग फुटलं
सुरुवातीपासूनच या प्रकरणात पोलिसांना काही वेगळ्या शंका उपस्थित होत होत्या. शेवटी पुरावे आणि खबऱ्यांमार्फत पोलिसांना माहिती मिळाली की उमेदवारानेच हे सगळे षडयंत्र रचले आहे. मारहाण झाल्यापासून संपूर्ण प्रकरण संशयास्पद वाटत होतं. तपासाअंती फिर्यादीच आरोपी निघाला आहे. लोकांची सहानुभूती मिळवत मते मिळवण्यासाठीच हा प्रकार केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. दोन जणांना अटक करण्यात आली आहे,