मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोलीचे अभियंता असणारे योगेश नांदेड हे सिडको भागात राहतो. तर त्यांचे आई-वडील भाऊ हे वसमत शहरात राहतात. योगेश यांनी काही दिवसांपूर्वी श्रीयोग एक्स्पोर्ट नावाने कंपनीची नोंदणी केली आहे. आणि याच व्यवसायासंदर्भात ते इराणमध्ये सादिक नावाच्या एका व्यक्तीला भेटण्यासाठी गेले असल्याचे त्यांच्या भावाने सांगितले आहे.
गेल्या 5 डिसेंबर रोजी योगेश भारतातून इराणमध्ये गेले होते. त्यानंतर इराणमधील तेहरान शहरातील एका हॉटेलमध्ये ते थांबले होते. त्यानंतर त्यांनी पत्नी व मुलाशी व्हिडिओकॉल द्वारे संपर्क केला होता. मात्र 7 डिसेंबर पासून त्यांचा कोणताही संपर्क झाला नाही. त्यात 11 डिसेंबर रोजी त्यांचा परतीचा प्रवास होता. त्यामुळे कुटुंबीयांनी विमानतळ प्रशासनाशी संपर्क केला परंतु ते विमानात बसले नसल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.
advertisement
तसेच कुटुंबीयांनी इराण मधील भारतीय दूतावासाशी देखील संपर्क केला परंतु योग्य प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती योगेश यांच्या भावाने दिली आहे. त्यामुळे आता हे कुटुंबीय काळजीत पडले आहेत. याप्रकरणी योगेश यांची पत्नी श्रद्धा पांचाळ यांच्या तक्रारीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करतायत.