TRENDING:

पठ्ठ्या मालकाचे 50 हजार ऑनलाईन रमीत हारला अन् दिली चोरीची तक्रार, पोलिसांनी घडवली जन्माची अद्दल

Last Updated:

चोरीची खोटी तक्रार दाखल करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
हिंगोली, 31 ऑगस्ट, मनष खरात : हिंगोलीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणानं आपल्या मालकाचे पन्नास हजार रुपये ऑनलाईन रमीमध्ये हारले. त्यानंतर त्यानं चोरीचा बनाव रचला. चोरांनी रात्रीच्या वेळी आपले पैसे चोरून नेल्याची खोटी तक्रार त्यानं पोलीस ठाण्यात दाखल केली. मात्र अवघ्या काही तासांमध्ये पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे. सत्य समोर येताच पोलिसांनाही धक्का बसला. पैसे चोरी झाले नसून तो ते पैसे ऑनलाईन रमीत हरल्याचं पोलीस चौकशीत समोर आलं.
News18
News18
advertisement

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, या प्रकरणातील आरोपीचं नाव नितीन चिपाडे असं आहे. नितीन चिपाडे हा आपल्या मालकाचे पन्नास हजार रुपये ऑनलाईन रमीमध्ये हारला. त्यानंतर त्याने पैसे चोरीला गेल्याचा बनाव रचला. रात्रीच्या वेळी चोरांनी आपले पैसे दमदाटी करून चोरल्याची तक्रार त्यानं पोलीस ठाण्यात दाखल केली.

पोलिसांनी तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असता धक्कादायक माहिती समोर आली. समोर आलेल्या माहितीमुळे पोलीसही चक्रावले. हा तरुण पन्नास हजार रुपये ऑनलाईन रमीमध्ये हारला, त्यानंतर त्याने चोरीचा बनाव केल्याचं पोलीस तपासात समोर आलं. या प्रकरणात पोलिसांनी संबंधित तरुण आणि त्याला खोटी तक्रार देण्याचा सल्ला देणाऱ्या त्याच्या दोन मित्रांवर गुन्हा दाखल केला आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/हिंगोली/
पठ्ठ्या मालकाचे 50 हजार ऑनलाईन रमीत हारला अन् दिली चोरीची तक्रार, पोलिसांनी घडवली जन्माची अद्दल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल