TRENDING:

Maratha Reservation : सातारा अन् कोल्हापूर गॅझेटियरमध्ये नेमकं काय लिहिलंय? 'या' नोंदीच देणार मराठा आरक्षण, वाचा सविस्तर...

Last Updated:

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या लढाईत ब्रिटिशकालीन सातारा (1885) आणि कोल्हापूर (1886) गॅझेटियर हे महत्त्वाचे ऐतिहासिक पुरावे म्हणून सादर केले जात आहेत. या दोन्ही सरकारी दस्तावेजांमध्ये...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) ब्रिटिशकालीन 'गॅझेटियर' (Gazetteer) हा एक महत्त्वाचा आधार पाहिला जातो. याच पार्श्वभूमीवर जसं हैदराबाद गॅझेटियर आहे, त्याचप्रमाणे कोल्हापूर अन् सातारा गॅझेटियर हा दस्ताऐवजीही महत्त्वाचा ठरणार आहे. या तिन्ही गॅझेटियरमध्ये महत्त्वाच्या नोंदी आहे. ज्यात मराठा आणि कुणबी जवळपास सारखे असल्याचा पुरावा सिद्ध होतो. जो मराठा आरक्षणासंदर्भात अत्यंत महत्त्वाचा ठरतो. चला तर सातारा आणि कोल्हापूर गॅझेटियर संदर्भात सविस्तर जाणून घेऊया...
Maratha Reservation
Maratha Reservation
advertisement

गॅझेटियर म्हणजे काय?

गॅझेटियर म्हणजे एखाद्या प्रदेशाची किंवा जिल्ह्याची अधिकृत माहिती देणारे सरकारी प्रकाशन. यात केवळ नकाशा किंवा भौगोलिक माहिती नसते, तर त्या प्रदेशाचा इतिहास, लोकसंख्या, जाती-जमाती, त्यांच्या प्रथा, संस्कृती, शेती आणि प्रशासनाची सविस्तर नोंद असते. ब्रिटिशांनी प्रशासकीय सोयीसाठी 19 व्या शतकात अशी गॅझेटियर्स तयार केली, जी आज सामाजिक आणि कायदेशीर वादांमध्ये महत्त्वाचे पुरावे ठरत आहेत.

advertisement

सातारा आणि कोल्हापूर गॅझेटियर : पश्चिम महाराष्ट्रासाठी आधारस्तंभ

पश्चिम महाराष्ट्रासाठी 1885 चे सातारा जिल्हा गॅझेटियर आणि 1886 चे कोल्हापूर जिल्हा गॅझेटियर अत्यंत महत्त्वाचे ठरले आहेत. या दोन्ही गॅझेटियरमध्ये मराठा आणि कुणबी समाज एकच असल्याचे ब्रिटिश अधिकाऱ्यांनीच नमूद केले आहे.

सातारा गॅझेटियर (1885) मध्ये म्हटले आहे की..

“Kunbis and Marathas are practically the same class. The distinction between them is very slight. Many Kunbis call themselves Marathas, and many Marathas are known as Kunbis.”

advertisement

(कुणबी आणि मराठा हे प्रत्यक्षात एकच वर्ग आहेत. त्यांच्यात फारसा फरक नाही. अनेक कुणबी स्वतःला मराठा म्हणवतात आणि अनेक मराठे कुणबी म्हणून ओळखले जातात.)

“The Marathas of Satara are chiefly landholders and cultivators. They are closely connected with the Kunbis, both socially and economically.”

(साताऱ्यातील मराठे प्रामुख्याने जमीनधारक आणि शेतकरी आहेत. ते सामाजिक तसेच आर्थिक दृष्ट्या कुणब्यांशी अतिशय जवळीक ठेवतात.)

advertisement

कोल्हापूर गॅझेटियर (1886) मधील नोंद तर अधिक स्पष्ट आहे...

“Kunbis and Marathas are so closely connected that it is difficult to distinguish between them. Both are agriculturists and often intermarry. Many Kunbis call themselves Marathas, and many Marathas are described as Kunbis.”

(कुणबी आणि मराठा इतके एकरुप आहेत की त्यांच्यात फरक करता येत नाही. दोन्हीही शेतकरी वर्ग असून त्यांच्यात परस्पर विवाहसंबंध होतात. अनेक कुणबी स्वतःला मराठा म्हणवतात, तसेच अनेक मराठे कुणबी म्हणून ओळखले जातात.)

advertisement

“The Marathas of Kolhapur are mainly cultivators and landholders. They share the same social and economic position as Kunbis.”

(कोल्हापूरमधील मराठे मुख्यत्वे जमीनधारक व शेतकरी आहेत. ते सामाजिक व आर्थिकदृष्ट्या कुणब्यांप्रमाणेच आहेत.)

या ऐतिहासिक नोंदींमुळे मराठा आणि कुणबी हे मुळात एकच शेतकरी समाज असल्याचे सिद्ध होते. त्यामुळेच आज मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) लढ्यात हे ब्रिटिशकालीन दस्तऐवज न्यायालयीन आणि प्रशासकीय पातळीवर सर्वात मोठे पुरावे म्हणून सादर केले जात आहेत. हे गॅझेटियर केवळ जुन्या नोंदी नसून, मराठा आरक्षण चळवळीचे ऐतिहासिक आधारस्तंभ बनले आहेत.

हे ही वाचा : सरसकट दाखल्यांवरून जुंपली, फडणवीस-जरांगेंमध्ये जुंपली, हैदराबाद गॅजेटमुळे कुणाला दाखले मिळणार?

हे ही वाचा : 1994 मध्ये कुणाला मिळालं आरक्षण? आरक्षणाची प्रक्रिया नियमानुसार नव्हती? जरांगेच्या वक्तव्याने नवा वाद

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maratha Reservation : सातारा अन् कोल्हापूर गॅझेटियरमध्ये नेमकं काय लिहिलंय? 'या' नोंदीच देणार मराठा आरक्षण, वाचा सविस्तर...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल