TRENDING:

मृत्यूपत्र कसं तयार करायचं? ते बदलता किंवा रद्द करता येते का? अटी-नियम काय सांगतात? A TO Z माहिती

Last Updated:

Mrutyupatra : व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या संपत्तीचे योग्य वाटप व्हावे यासाठी मृत्युपत्र अत्यंत महत्त्वाचे ठरते. मात्र, हे मृत्युपत्र कायदेशीरदृष्ट्या वैध ठरण्यासाठी काही अटी पूर्ण करणे आवश्यक असते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या संपत्तीचे योग्य वाटप व्हावे यासाठी मृत्युपत्र अत्यंत महत्त्वाचे ठरते. मात्र, हे मृत्युपत्र कायदेशीरदृष्ट्या वैध ठरण्यासाठी काही अटी पूर्ण करणे आवश्यक असते. Indian Succession Act 1925 Section 63 नुसार या अटी स्पष्ट करण्यात आल्या आहेत. तेच आपण जाणून घेऊया..
Mrutyupatra
Mrutyupatra
advertisement

मृत्युपत्रासाठी आवश्यक अटी- नियम काय?

1)सही किंवा अंगठा आवश्यक

मृत्युपत्रावर संबंधित व्यक्तीची सही किंवा अंगठा असणे अत्यावश्यक आहे. यामुळे दस्तऐवजाची वैधता सिद्ध होते.

2)दोन साक्षीदारांची सही

मृत्युपत्रावर किमान दोन सक्षम साक्षीदारांनी सही केलेली असावी. या साक्षीदारांना कायद्यात “अटेस्टिंग विटनेस” असे म्हटले जाते.

3)साक्षीदारांची उपस्थिती महत्त्वाची

दोन्ही साक्षीदारांनी वसीयतकर्ता सही करताना प्रत्यक्ष पाहिलेले असणे गरजेचे आहे. तसेच प्रत्येक साक्षीदाराने सही करताना वसीयतकर्ता आणि दुसरा साक्षीदार उपस्थित असणे आवश्यक ठरते.

advertisement

मृत्युपत्र नोंदणी आवश्यक आहे का?

मृत्युपत्र नोंदणी करणे कायद्याने बंधनकारक नाही. नोंदणी न केलेले मृत्युपत्रही वैध ठरू शकते. मात्र, नोंदणी केल्यास दस्तऐवज अधिक विश्वासार्ह ठरतो आणि भविष्यात वाद उद्भवल्यास तो सोडवणे सोपे जाते. नोंदणीकृत कागदपत्रांना कायद्यात अधिक महत्त्व दिले जाते.

मृत्युपत्र बदलता किंवा रद्द करता येते का?

संबंधित व्यक्ती मृत्यूपत्र आपल्या आयुष्यात कधीही मृत्युपत्र बदलू किंवा रद्द करू शकतो. यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत जसे की, नवीन मृत्युपत्र तयार करणे, लिखित स्वरूपात रद्द करणे, मूळ मृत्युपत्र नष्ट करणे, नोंदणीकृत मृत्युपत्र असल्यास, ते रद्द करण्यासाठी नोंदणीकृत दस्तऐवज तयार करणे

advertisement

न्यायालय मृत्युपत्र तपासताना काय पाहते?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: कृषी मार्केटमध्ये उलटफेर, कांदा, केळीनं वाढवलं टेन्शन, लिंबू अन् द्राक्षांना किती मिळाला भाव?
सर्व पहा

मृत्युपत्राच्या वैधतेवर शंका असल्यास न्यायालय काही महत्त्वाच्या बाबींची तपासणी करते.यामध्ये नैसर्गिक वारसांना पूर्णपणे वगळले आहे का? लाभार्थी व्यक्तीने मृत्युपत्र तयार करण्यात हस्तक्षेप केला आहे का? मृत्यूपत्र करणाऱ्याची मानसिक स्थिती योग्य होती का? या बाबी तपासल्या जातात. अशा परिस्थितीत मृत्युपत्र सादर करणाऱ्या व्यक्तीवर त्या शंका दूर करण्याची जबाबदारी असते.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मृत्यूपत्र कसं तयार करायचं? ते बदलता किंवा रद्द करता येते का? अटी-नियम काय सांगतात? A TO Z माहिती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल