TRENDING:

नाद केला अन् वाया गेला, 15 दिवसांपूर्वी लग्न झालेला तरुण हकनाक मेला, जालन्यात भरदिवसा हत्या

Last Updated:

Jalna News: जालना शहरातील मोतीबाग परिसरात एका २८ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. दोन टोळक्यांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून ही हत्या झाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
रवी जैस्वाल, प्रतिनिधी जालना: जालना शहरातील मोतीबाग परिसरात एका २८ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. दोन टोळक्यांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून ही हत्या झाली आहे. रवी अशोक लाड असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. त्याचं १५ दिवसांपूर्वी लग्न झालं होतं. पण त्याचा संसार अर्ध्यावर मोडला आहे. रेड्यांच्या टकरीचा नाद तिच्या जिवावर बेतला आहे.
jalna murder news
jalna murder news
advertisement

नेमकी घटना काय?

जालन्यात रेड्यांच्या टकरीवरुन दोन गटात वाद होऊन एकाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली आहे. रवी अशोक लाड (वय 28 वर्ष) असं मयत तरुणाचं नाव असून या घटनेत अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. शहरातील मोतीबाग परिसरात रविवारी रेड्यांच्या टकरी लावण्यात आल्या होत्या. त्याठिकाणी दोन गटात वाद निर्माण झाला होता.

advertisement

त्यानंतर सायंकाळच्या सुमारास दोन्ही गट पुन्हा समोरासमोर आले. या वादाचे रूपांतर नंतर शिवीगाळ आणि हाणामारीत झाले. या मारहाणीत एका गटातील तिघे गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना जिल्हा सरकारी घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्या आले. त्यातील रवी अशोक लाड (वय 28 वर्ष) याच्या पोटात धारदार शस्त्राचे वार असल्याने त्याची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.

advertisement

मात्र उपचारादरम्यान रात्री एक वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर यामध्ये प्रेम लाड (वय 20 वर्ष) आणि नरेश अवघड (वय 20 वर्ष) हे सुद्धा जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल केला असून पोलीस कारवाई करत आहेत.

१५ दिवसांपूर्वीच लग्न

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तृतीयपंथी नेमकं कोण? ‘त्या’ विधेयकानं वातावरण तापलं, LGBTQ समुदाय रस्त्यावर, का होतोय विरोध, Video
सर्व पहा

मारहाणीत मृत पावलेल्या रवीच्या पोटात आणि डोक्याला जबर मार लागला होता. यातचं त्याचा मृत्यू झाला. रवी लाड या तरुणाचं १५ दिवसांपूर्वीच लग्न झालं होतं. संसार फुलण्याआधीच पतीचा मृत्यू झाल्यानं पत्नीसह आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नाद केला अन् वाया गेला, 15 दिवसांपूर्वी लग्न झालेला तरुण हकनाक मेला, जालन्यात भरदिवसा हत्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल