TRENDING:

Manoj Jarange : 'मला त्रास होतोय, पोटात पाणी नाही पण..'; जरांगे पाटील भावुक

Last Updated:

मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जालना, 28 ऑक्टोबर, सिद्धार्थ गोदाम : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी चाळीस दिवसांचा वेळ दिला होता. मात्र चाळीस दिवसांत आरक्षण न मिळाल्यानं जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. त्यांनी आज पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते भावूक झाले. मला त्रास होत आहे. पोटात पाणी नसल्यानं अडचण येत आहे. पण माझ्या त्रासापेक्षा समाजाचा त्रास मोठा आहे, त्यामुळे मी माझ्या त्रासाकडे लक्ष देणार नाही असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
News18
News18
advertisement

पुढे बोलताना ते म्हणाले की, कुणीही मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करू नका. मराठी समाजाला तातडीनं आरक्षण द्यावं, हे सरकारला माझं शेवटचं सांगणं आहे. संपूर्ण गावांनी उपोषणात सहभागी व्हावं. जीथे साखळी उपोषण सुरू आहे, तिथे अमरण उपोषण सुरू करा. उद्यापासून पाणी पेऊन उपोषणाला बसा, उद्यापासून हजारो लोक अमरण उपोषणाला बसतील. उपोषणात कोणाचा जीव गेल्यास त्याची जबाबदारी सरकारची असेल असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कृषी मार्केटमध्ये मोठी उलथापालथ, केळी आणि कांद्याला कवडीमोल भाव, लिंबाची काय स्थिती?
सर्व पहा

संपूर्ण गाव एकजुटीनं एकत्र या, उपोषणाला बसा. कोणताही नेता आपल्या दारात आला नाही पाहिजे. तुम्हीही कोणत्या नेत्याच्या दारात जाऊ नका, असं आवाहानही यावेळी मराठा समाजाला जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आलं आहे. आंदोलन शांततेत करा, कोणीही उग्र आंदोलन करू नका असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
Manoj Jarange : 'मला त्रास होतोय, पोटात पाणी नाही पण..'; जरांगे पाटील भावुक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल