लोकराजास अनोखी मानवंदना
कलेला राजाश्रय देणाऱ्या राजर्षी शाहू महाराज छत्रपती यांच्या जयंतीनिमित्त साकारलेल्या व्यक्तिचित्राचा आकार 7×9 फूट इतका आहे. यामध्ये मूग, काळे वाटाणे, तांदूळ, डाळ, साबुदाणा, गहू, मोहरी, मसूर या धान्यांचा वापर केला आहे. पाच तास व्यक्तिचित्र रेखाटत चिमुकल्यांनी राजर्षी शाहू छत्रपतींना अनोखी मानवंदना दिली आहे. लहान वयातच मुलांना आदर्शांची ओळख करून देण्याच्या हेतूने उपक्रम राबवला असल्याचे कलाशिक्षक केवल यादव सांगतात.
advertisement
Mumbai Tourism: मुंबईत हे नाही पाहिलं, तर पाहिलं काय? पावसाळी पर्यटनासाठी 5 बेस्ट ठिकाणं!
अशी अनोखी मानवंदना
व्यक्तिचित्राचा आकार 7×9 फूट आहे. हे व्यक्तिचित्र साकारण्यासाठी साधारण वेळ हा 5 तास लागला आहे. व्यक्तिचित्र साकारण्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षकांनी सहभाग नोंदविला. हे व्यक्तिचित्र पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे.
विद्यार्थ्यांच्या सहभागाने अनेक कलाकृती
कलाशिक्षक केवल यादव यांनी यापूर्वी थेट ड्राईंग कागदावर विद्यार्थ्यांच्या हाताच्या ठशापासून छत्रपती शिवरायांची प्रतिकृती साकारून शिवजयंतीच्या शुभेच्छा देखील दिल्या होत्या. विद्यार्थांच्या सहभागाने कलाकृती साकारल्यास मुलांना कलेसह संबंधित महापुरुषांविषयी अनेक प्रश्न पडतात. त्यांची जिज्ञासूवृत्ती कायम ठेवण्यासाठी, अशा उपक्रमांची मदत होत असल्याचा अनुभव कलाशिक्षक केवल यादव यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितला.