खरं तर सरकारने जुलै महिन्यात या योजनेची घोषणा केली होती आणि जूनपासून महिलांच्या खात्यात 1500 रूपये जमा करायला सूरूवात केली होती. त्यामुळे ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्याआधीच अर्ज भरले आहेत.त्या महिलांच्या खात्यात विधानसभा निवडणुकीआधी पाच महिन्याचे ऑक्टोबरपर्यंतचे 7500 रूपये जमा झाले होते.
दरम्यान ऑक्टोबरमध्ये निवडणुका असल्या कारणाने महायुती सरकारने लाडक्या बहिणींना योजनेचा हप्ता वाढवून देण्याची घोषणा केली होती. 1500 रूपयाचा निधी 2100 रूपये पर्यंत देण्यापर्यंतचे आश्वासन सरकारने महिलांना दिले होते. त्यामुळे महिलांना महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर 2100 रूपये मिळणार असल्याची अपेक्षा होती. मात्र सत्तास्थापणेचा गोंधळ आणि मंत्रिमंडळाचा खातेवाटप यामुळे योजनेचा निधी महिलांना देण्यात काहीसा उशीर झाला.त्यात महिलांना आता फक्त 1500 रूपयेच देण्यात आले. त्यामुळे महिलांमध्ये काहीशी नाराजी आहे.
advertisement
आतापर्यंत सरकारने महिलांना सहा हप्ते दिले आहेत. निवडणुकीआधी महिलांच्या खात्यात पाच हप्ते जमा झाले होते. त्यानंतर सहावा हप्ता निवडणुकीनंतर देण्यात आला होता. हा हफ्ता नोव्हेंबरचा होता. त्यामुळे डिसेंबरचा सातवा हप्ता महिलांच्या खात्यात कधी जमा होणार आहे? असा प्रश्न आहे. अशात आता हा हप्ता नवीन वर्षातच महिलांच्या खात्यात जमा होणार आहे.कारण डिसेंबर महिना संपायला अवघे काही दिवसच उरले आहेत.
किती पैसै मिळणार?
सरकारने योजनेचा निधी वाढवण्याचे महिलांना आश्वासन दिले होते.मात्र लगेच हे पैसे वाढवून देणे सरकारसाठी ही अवघड बाब असणार आहे. कारण अर्थसंकल्पात निधीसाठी केलेली तरतूद या सगळ्या महत्वाच्या बाबी आहेत. त्यामुळे कदाचित महिलांना नवीन वर्षात 1500 रूपये मिळण्याची शक्यता आहे. जर हा निधी देण्या दरम्यान काही निर्णय़ झाला तर निधी वाढवून मिळण्याची शक्यता आहे.