TRENDING:

मतदानाच्या आदल्या रात्री दीड वाजता कोकणात मोठी घडामोड, भाजप नेत्याच्या कारमध्ये आढळली लाखोंची रक्कम

Last Updated:

निवडणुकीच्या प्रचाराची वेळ संपल्यानंतर मालवणमध्ये झालेल्या पोलीस नाकाबंदीत देवगड भाजपचे तालुका अध्यक्ष महेश नारकर यांच्या गाडीत मोठी रोख रक्कम आढळल्याने खळबळ उडाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
भारत केसरकर, प्रतिनिधी मालवण: नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचाराची वेळ संपल्यानंतर मालवणमध्ये झालेल्या पोलीस नाकाबंदीत देवगड भाजपचे तालुका अध्यक्ष महेश नारकर यांच्या गाडीत मोठी रोख रक्कम आढळल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून पोलीस ठाण्यात मोठा राजकीय तणाव निर्माण झाला होता, कारण शिवसेना (शिंदे गट) आमदार निलेश राणे यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली.
News18
News18
advertisement

नाकाबंदीत मोठी कारवाई

नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालवण पोलिसांनी रात्री १० वाजता प्रचार संपल्यानंतर रात्री उशिरा नाकाबंदी सुरू केली होती. याच वेळी भाजपचे देवगड तालुका अध्यक्ष महेश नारकर यांच्या MH-07-AS-6960 क्रमांकाच्या वाहनाची तपासणी केली असता, त्यांच्या गाडीत पोलिसांना मोठी रोख रक्कम आढळली. ही रक्कम निवडणुकीच्या काळात आढळल्याने पोलिसांनी तातडीने हे वाहन अधिक तपासणीसाठी मालवण पोलीस ठाण्यात आणले.

advertisement

पोलीस ठाण्यात मध्यस्थीचा प्रयत्न

वाहन पोलीस ठाण्यात आणल्यानंतर लगेचच मालवण येथील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाबा परब आणि अजिंक्य पाताडे यांनी नंबर प्लेट नसलेली कार घेऊन पोलीस ठाणे गाठले. सूत्रांनुसार, परब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे प्रकरण मिटवण्यासाठी पोलिसांवर दबाव आणण्याचा आणि हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला.

निलेश राणे आक्रमक; गुन्हा दाखल करण्याची मागणी

advertisement

बाबा परब हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळताच शिवसेना (शिंदे गट) आमदार निलेश राणे यांनी तातडीने मालवण पोलीस ठाण्यात धाव घेतली. राणे यांनी अतिशय आक्रमक पवित्रा घेत, "जोपर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मी पोलीस ठाण्यातून मागे हटणार नाही," अशी ठाम भूमिका घेतली. त्यांच्या या भूमिकेमुळे पोलीस ठाण्यातील वातावरण चांगलेच तणावपूर्ण झाले होते.

advertisement

'रोख रक्कम बाजूला ठेवा...' संभाषणाचे व्हिडिओ व्हायरल

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात चढ-उतार, कांदा आणि मक्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

या संपूर्ण गदारोळात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाबा परब आणि पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांमध्ये झालेले संभाषण असलेला एक व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये "गाडीतील रोख रक्कम बाजूला ठेवा किंवा आम्हाला मोकळे करा," अशा आशयाचे संभाषण ऐकू येत असल्याचा दावा केला जात आहे. निवडणुकीच्या आचारसंहिता काळात मोठ्या रकमेसह भाजप पदाधिकाऱ्याचे वाहन आढळणे आणि त्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी मध्यस्थीचा प्रयत्न करणे, यामुळे मालवणच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मतदानाच्या आदल्या रात्री दीड वाजता कोकणात मोठी घडामोड, भाजप नेत्याच्या कारमध्ये आढळली लाखोंची रक्कम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल