TRENDING:

Latur ZP Election : धाकट्या जाऊबाईंकडून मोठीचा 2 मतांनी पराभव, जिल्हा परिषद निवडणुकीचा सगळ्यात थरारक निकाल!

Last Updated:

महाराष्ट्राच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये थरारक निकाल लागले आहेत. जिल्हा परिषदेमध्ये नणंदेने भावजयीला पराभवाचा धक्का दिला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
शशिकांत पाटील, प्रतिनिधी
धाकट्या जाऊबाईंकडून मोठीचा 2 मतांनी पराभव, जिल्हा परिषद निवडणुकीचा सगळ्यात थरारक निकाल!
धाकट्या जाऊबाईंकडून मोठीचा 2 मतांनी पराभव, जिल्हा परिषद निवडणुकीचा सगळ्यात थरारक निकाल!
advertisement

लातूर : महाराष्ट्राच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये थरारक निकाल लागले आहेत. लातूरच्या रेणापूर तालुक्यातील कामखेडा जिल्हा परिषदेमध्ये अटीतटीची लढत झाली. या लढतीमध्ये काँग्रेसच्या आशाताई भिसे यांनी त्यांचीच भावजय सरिता भिसे यांचा अवघ्या 2 मतांनी पराभव केला आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या माजी आमदार त्र्यंबक नाना भिसे यांना धक्का बसला आहे.

लातूर जिल्हा परिषदेच्या 59 जागांपैकी 52 जागांचे निकाल लागले आहेत, ज्यात काँग्रेस हा 19 जागांसह पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे, तर भाजपला 17 जागांवर विजय मिळाला आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी 10 जागांवर विजयी झाली आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 1, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 1, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 1, मनसेला एक आणि 2 अपक्ष विजयी झाले आहेत.

advertisement

लातूर जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस पहिल्या क्रमांकाचा पक्ष होण्याची शक्यता असली तरी भाजप राष्ट्रवादी अजित पवार आणि शिवसेनेच्या मदतीने बहुमतापर्यंत पोहोचू शकते. विजयी झालेले 2 अपक्ष कोणती भूमिका घेणार? यावरही सत्तेचं गणीत अवलंबून असणार आहे.

हेही वाचा: महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक निकाल २०२६ चे लाईव्ह अपडेट्स

संभाजी नगरमध्ये एका मताने पराभव

advertisement

संभाजी नगर तालुक्यातील वडगाव कोल्हाटी गटातील भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार सचिन गरड यांचा एका मताने विजय झाला आहे. सचिन गरड यांनी हनुमंत भोंडवे यांचा पराभव केला. एका मताने निवडून आलेल्या गरड यांना या विजयानंतर अश्रू अनावर झाले. वाळू माफिया आणि ताकदवर उमेदवारांच्या विरोधात लढलो. जनतेने सामान्य व्यक्तीला निवडून दिलं, त्यांचे मी आभार मानतो, अशी प्रतिक्रिया सचिन गरड यांनी दिली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गोड नाही तर तिखट, हटके मसालेदार कलिंगड, मुंबईत इथं चाखा चवं, Video
सर्व पहा

दुसरीकडे पराभव मान्य करतो, एका मताने का होईना पराभव असतो आणि त्या एका मताची किंमत मला आज कळाली, असं वक्तव्य हनुमंत भोंडवे यांनी केलं आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Latur ZP Election : धाकट्या जाऊबाईंकडून मोठीचा 2 मतांनी पराभव, जिल्हा परिषद निवडणुकीचा सगळ्यात थरारक निकाल!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल