TRENDING:

Latur ZP Election Results : भाजप निम्म्यावर, काँग्रेस नंबर वन, राष्ट्रवादीमुळे कशी फिरली लातूरची निवडणूक?

Last Updated:

लातूर जिल्हा परिषदेच्या सर्व 59 जागांचा निकाल हाती आला आहे. निवडणूक निकालामध्ये काँग्रेस हा सगळ्यात मोठा पक्ष ठरला आहे, पण तरीही लातूर जिल्हा परिषदेमध्ये महायुतीची सत्ता येणार हे निश्चित झालं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
शशिकांत पाटील, प्रतिनिधी
भाजप निम्म्यावर, काँग्रेस नंबर वन, राष्ट्रवादीमुळे कशी फिरली लातूरची निवडणूक?
भाजप निम्म्यावर, काँग्रेस नंबर वन, राष्ट्रवादीमुळे कशी फिरली लातूरची निवडणूक?
advertisement

लातूर : लातूर जिल्हा परिषदेच्या सर्व 59 जागांचा निकाल हाती आला आहे. निवडणूक निकालामध्ये काँग्रेस हा सगळ्यात मोठा पक्ष ठरला आहे, पण तरीही लातूर जिल्हा परिषदेमध्ये महायुतीची सत्ता येणार हे निश्चित झालं आहे. लातूर जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसचा 23 जागांवर विजय झाला आहे. याआधी 2017 च्या जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसला 15 जागाच मिळाल्या होत्या. दुसरीकडे भाजपला मात्र मोठा धक्का बसला आहे. 2017 च्या निवडणुकीमध्ये 36 जागांवर विजय मिळवलेल्या भाजपला यावेळी 18 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 6 जागांवरून 12 जागांवर मुसंडी मारली आहे.

advertisement

भाजपला फटका का बसला?

लातूर जिल्हा परिषदेमध्ये अहमदपूर, जळकोट आणि उदगीर या तालुक्यांमध्येच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची युती झाली होती. तर एकनाथ शिंदेंची शिवसेना संपूर्ण जिल्ह्यात स्वबळावर लढली. ज्या तालुक्यांमध्ये राष्ट्रवादीसोबत युती झाली नाही, तिथे अजित पवारांच्या निधनानंतर सहानुभूती राष्ट्रवादी काँग्रेसला मतांच्या रुपातून मिळाल्याचं सांगण्यात येत आहे. तसंच अंतर्गत गटबाजी आणि उमेदवार निवडीवरूनही भाजपमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात आहे.

advertisement

महापालिकेतही काँग्रेसला यश

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गोड नाही तर तिखट, हटके मसालेदार कलिंगड, मुंबईत इथं चाखा चवं, Video
सर्व पहा

जिल्हा परिषद निवडणुकीच्या आधी महिनाभरापूर्वी झालेल्या लातूर महापालिका निवडणुकीमध्येही काँग्रेसला घवघवीत यश मिळालं होतं. 43 जागा जिंकून काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं होतं, तर भाजपला 22, वंचित बहुजन आघाडीला 4 आणि राष्ट्रवादीला एका जागेवर यश मिळालं होतं.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Latur ZP Election Results : भाजप निम्म्यावर, काँग्रेस नंबर वन, राष्ट्रवादीमुळे कशी फिरली लातूरची निवडणूक?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल