मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रात पावसाचं संकट
स्कायमेट हवामान तज्ज्ञ महेश पलावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ मार्च रोजी हिंगोली, जालना, नांदेड, लातूर आणि धाराशिव या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण तयार होईल. त्याचप्रमाणे सांगली, सातारा आणि कोल्हापूरसह विदर्भातील काही भागांतही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागराकडून येणारे बाष्पयुक्त वारे आणि उत्तरेकडील हवामानातील बदलांमुळे हा पाऊस पडणार आहे.
advertisement
नेमकं का बदलतंय हवामान?
सध्या भारताच्या उत्तर भागात एकामागून एक 'वेस्टर्न डिस्टरबन्स सक्रिय होत आहेत. येत्या २६ मार्चला अजून एक प्रबळ सिस्टीम उत्तर भारतात धडकणार आहे. त्याचा थेट परिणाम मध्य भारतासह महाराष्ट्रावर होताना दिसतोय. हवेत ओलावा वाढल्यामुळे ढग तयार होऊन अचानक गडगडाटासह पाऊस पडतोय. मार्चमध्येत तापमानाचा पारा हा 40 अंशांवर पोहोचल्याने उकाडा वाढल्याने लोक हैराण झाले आहेत. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हे लहरी हवामान असंच चालू राहण्याची शक्यता आहे.
नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार आहे. यावेळी वाऱ्याचा वेग हा ताशी 50 किमी राहणार आहे. तर दुसरीकडे कोकणात मात्र उकाडा अति प्रचंड वाढण्याची शक्यता आहे. मुंबई, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा वाढणार आहे. त्यामुळे या भागातील लोकांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे.
