कांद्याची आवक
राज्याच्या मार्केटमध्ये आज 2 लाख 74 हजार 237 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. कालच्या तुलनेत आवकेत पंधरा हजार क्विंटलची सुधारणा झाली. यापैकी 1 लाख 11 हजार 497 क्विंटल सर्वाधिक आवक नाशिक बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 310 ते 1036 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला. तसेच नागपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 34 क्विंटल कांद्यास मिळालेला 2310 रुपये सर्वसाधारण भाव आजचा सर्वाधिक बाजारभाव ठरला.
advertisement
लिंबूची आवक
वाढत्या उन्हासह बाजारातील लिंबूची मागणी देखील वाढते आहे. लिंबूच्या आवकेत आज सुधारणा दिसून आली. राज्याच्या मार्केटमध्ये आज 891 क्विंटल आवक राहिली. यापैकी मुंबई बाजारात आवक झालेल्या 346 क्विंटल लिंबूस 2500 ते 3500 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच छत्रपती संभाजीनगर मार्केटमध्ये आवक झालेल्या 25 क्विंटल लिंबूस 13000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.
द्राक्ष आवक
द्राक्ष हंगामावर झालेला युद्धस्थितीचा परिणाम तसेच अवकाळी पावसाचा परिणाम पाहता राज्याच्या कृषीमार्केटमध्ये द्राक्षाची आवक वाढेल असा द्राक्ष बाजारातील जाणकारांचा अंदाज आहे. मात्र आजवर बाजारात द्राक्षाची आवक दबावातच दिसते. राज्याच्या मार्केटमध्ये आज केवळ 893 क्विंटल द्राक्षाची आवक झाली. यापैकी पुणे बाजारात 697 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास 6500 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच छत्रपती संभाजीनगर बाजारात आवक झालेल्या 29 क्विंटल द्राक्षास 13000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.
केळीची आवक
राज्याच्या मार्केटमध्ये केळीला चांगला उठाव मिळतोय. मात्र सरासरीच्या तुलनेत केळीची आवक कमीच आहे. आज केवळ 328 क्विंटल केळीची आवक झाली. नाशिक बाजारात आवक झालेल्या 200 क्विंटल केळीस प्रतीनुसार 800 ते 1800 रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला. अवकाळी पावसाचा आणि युद्धाचा केळी पिकास फटका बसल्याचे उत्पादक सांगत आहेत.





