TRENDING:

Maharashtra ZP Election Result: राज्यातील12 जिल्हा परिषदांवर कोणाची सत्ता? कोण उधळणार गुलाल?

Last Updated:

Maharashtra ZP Election Result: जिल्हा परिषदेत कोण बाजी मारणार याचं चित्र आज स्पष्ट होणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई :  राज्यातील 12 जिल्हा परिषदा, 125 पंचायत समित्यांची मतमोजणी आज होणार आहे. या मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्हा परिषदेच्या 731 आणि पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी 7 फेब्रुवारीला मतदान झालं होतं. निवडणुकीच्या रिंगणात एकूण 7 हजार 438 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. जिल्हा परिषदेच्या जागांसाठी 2 हजार 624 तर पंचायत समितीसाठी 4 हजार 814 उमेदवारांचं भवितव्य पणाला लागलंय. जिल्हा परिषदेत कोण बाजी मारणार याचं चित्र आज स्पष्ट होणार आहे.
News18
News18
advertisement

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या राष्ट्रीय दुखवट्यानंतर ही निवडणूक पार पडली. 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडली, तर जानेवारी 2023 पासून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सत्ताधारी महायुतीचा भाग बनली. राज्याच्या राजकरणात मोठी उलथापालथ झाली. या राजकीय उलथापालथीनंतर अद्याप 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांची निवडणूक पहिल्यांदाच पार पडली. त्यातून राज्यातील राजकीय पक्षांविषयी जनतेचा सध्याचा कल स्पष्ट होणार आहे . आगामी निकाल सत्ताधारी आणि विरोधक दोघांसाठीही महत्त्वाचे ठरणार असून, बदललेल्या राजकीय समीकरणांनंतर जनतेचा विश्वास नेमका कुणाकडे आहे, याचा खरा अंदाज या निकालांतून येणार आहे.

advertisement

  अ. क्र.  जिल्हा परिषद  पक्ष  
1 रायगड
2 रत्नागिरी
3 सिंधुदुर्ग
4 पुणे
5 सातारा
6 सांगली
7 सोलापूर
8 कोल्हापूर
9 परभणी
10 लातूर
11 छ. संभाजीनगर
12 धाराशिव

advertisement

जनतेचा कौल कुणाला

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मानव संस्कृतीचे दुर्मिळ पुरावे, डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व विभागात अनोखा ठेवा
सर्व पहा

आगामी निकाल सत्ताधारी आणि विरोधक दोघांसाठीही महत्त्वाचे ठरणार असून, बदललेल्या राजकीय समीकरणांनंतर जनतेचा विश्वास नेमका कुणाकडे आहे, याचा खरा अंदाज या निकालांतून येणार आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra ZP Election Result: राज्यातील12 जिल्हा परिषदांवर कोणाची सत्ता? कोण उधळणार गुलाल?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल