TRENDING:

सिल्लोड पंचायत समिती-जिल्हा परिषद निकाल 2026, अब्दुल सत्तारांचा भाजपला चकवा, शिंदेंची शिवसेना आघाडीवर, पाहा Live Updates

Last Updated:

सिल्लोड तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. इथं सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यात थेट लढत होत आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये शिवसेना शिंदे गटाने आघाडी घेतली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सिल्लोड तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. इथं सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यात थेट लढत होत आहे. यामुळे निकालाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. ९ जिल्हा परिषद गट आणि १८ पंचायत समिती गणांमध्ये अनेक ठिकाणी तिरंगी व चौरंगी लढती असून, जातीय समीकरणे आणि घराणेशाही निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
सिल्लोड तालुक्यात ZP–PS मतमोजणीसाठी केंद्रावर तयारी
सिल्लोड तालुक्यात ZP–PS मतमोजणीसाठी केंद्रावर तयारी
advertisement

सिल्लोडमध्ये जिल्हा परिषदेचे 9 गट आणि पंचायत समितीचे 18 गण आहेत. जिल्हा परिषदेच्या 9 गटांमध्ये भराडी, उंडणगाव, शिवना, अजिंठा, अंभई, घाटलांद्रा, डोंगरगाव आणि फर्दापूरचा समावेश आहे.

सिल्लोड जिल्हा परिषद निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये शिवसेना शिंदे गटाने आघाडी घेतली आहे. अजिंठा पंचायत समिती गणात शिवसेना आघाडीवर आहे.

सिल्लोडमधील राजकीय चित्र

सिल्लोड तालुक्यात शिवसेना (शिंदे गट), भाजप, शिवसेना (उबाठा) आणि अपक्ष उमेदवार रिंगणात असल्याने बहुतांश गटांत बहुरंगी लढत आहे. भराडी, उंडणगाव, अजिंठा आणि अंभई गटांमध्ये सत्ताधारी शिवसेना–भाजप संघर्ष थेट दिसून येत आहे. त्यामुळे निकालात कुणालाही झटका बसू शकतो. अंभई गटात आमदार अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव अब्दुल अमीर सत्तार रिंगणात असल्याने ही लढत प्रतिष्ठेची ठरली आहे. तर घाटलांद्रा गटात अशोक गरुड यांनी कन्या श्रुती गरुड यांना मैदानात उतरवले असून, शिवसेनेच्या आशा गाडे यांच्याशी थेट लढत आहे.

advertisement

सिल्लोडमधील हाय होल्टेज लढती

भराडी: गणेश खेरमारे (शिवसेना) × राधाकृष्ण काकडे (भाजप)

उंडणगाव: कल्पना सोनवणे (शिवसेना) × सचिन वाघ (भाजप)

अजिंठा: आयेशा बेगम नासिर हुसेन (शिवसेना) × अलकाबाई चौडिये (भाजप)

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हवामानाचा परिणाम, गहू पिकांवर फुफुंदी मावा रोगाचा प्रदुर्भाव? असं करा व्यवस्थापन
सर्व पहा

अंभई: अब्दुल अमीर सत्तार (शिवसेना) × त्र्यंबक गव्हाणे (भाजप)

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सिल्लोड पंचायत समिती-जिल्हा परिषद निकाल 2026, अब्दुल सत्तारांचा भाजपला चकवा, शिंदेंची शिवसेना आघाडीवर, पाहा Live Updates
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल