सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिल्या अर्ध्या तासात वैजापूर मशाल पेटल्याचं दिसत आहे. वैजापूर तालुक्यात ठाकरे सेनेचे 4 उमेदवार आघाडीवर आहेत. कल्याण गायके, संजय निकम, पद्मबाई शिंदे आणि कल्याणी मिसाळ यांनी आघाडी घेतली आहे.
वैजापूरमधील प्रमुख राजकीय लढत
वैजापूर तालुक्यात शिवसेना–शिंदे गट विरुद्ध भाजप–राष्ट्रवादी युती अशी थेट लढत दिसून येत आहे. नगरपालिका निवडणुकीतील भाजप–राष्ट्रवादी यशानंतर तीच रणनीती जिल्हा परिषदेत राबवण्यात आली असून त्यामुळे सत्ताधारी गटासाठी आव्हान वाढलं आहे.
advertisement
वैजापूर पंचायत समितीतील हाय होल्टेज लढती
बोरसर, वांजरगाव, शिऊर या तिन्ही गटांमध्ये आमदार रमेश बोरनारे यांचे निकटवर्तीय शिलेदार रिंगणात उतरले असल्याने, भाजप–राष्ट्रवादी युतीने खास रणनीती आखत तगडे उमेदवार उभे केले आहेत. या गटांतील निकाल बोरनारेंसाठी प्रतिष्ठेचे मानले जात आहेत. ग्रामीण भागात बोरनारे गटाचे पारंपरिक वर्चस्व आहे, तर शहरी व निमशहरी भागात भाजप–राष्ट्रवादी युतीला चांगला प्रतिसाद मिळाल्याची चर्चा आहे.
पक्षनिहाय प्राथमिक चित्र
शिवसेना (शिंदे गट): 04
भाजप: 00
राष्ट्रवादी काँग्रेस: 00
अपक्ष / इतर: 00
