TRENDING:

रायगड ZP-PS निकाल 2026 LIVE : रायगडातून पहिले ३ निकाल आले हाती, कुणी मारली बाजी?

Last Updated:

Raigad ZP Election 2026 : रायगड जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील राजकारण तापले असून यंदाची निवडणूक अनेक अर्थांनी वेगळी ठरणार ठरली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
रायगड : जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील राजकारण तापले असून यंदाची निवडणूक अनेक अर्थांनी वेगळी ठरणार ठरली. बदलत्या राजकीय समीकरणांमुळे कोणता पक्ष आघाडी घेणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील अंतर्गत मतभेदांमुळे अनेक ठिकाणी पक्षांना स्वतंत्र किंवा वेगवेगळ्या आघाड्यांमध्ये लढावे लागत लागले होते.
raigad -zp-ps-result-2026-counting.jpg
raigad -zp-ps-result-2026-counting.jpg
advertisement

निकालाचे ताजे अपडेट्स

सध्याच्या निकलानुसार शिवसेना शिंदे गट ५ जागांवर आघाडीवर आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गट ३ जागांवर आघाडीवर आहे.

रायगडमध्ये भारत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले आघाडीवर आहेत.

रायगड शहापूरमधून राष्ट्रवादीचे अमित नाईक पहिल्या फेरीत आघाडीवर आहेत.

रायगड मधून राष्ट्रवादीने ३ जागांवर विजय मिळवला आहे. अमित नाईक यांच्यासह २ उमेदवार विजयी झाले आहेत.

advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गट आणि शिवसेनेत शिंदे-ठाकरे गटातील वादाचा थेट परिणाम जिल्हा परिषद निवडणुकीवर होताना दिसून आला. या पार्श्वभूमीवर भाजपने काही ठिकाणी राष्ट्रवादीसोबत, तर काही मतदारसंघांत शिवसेनेसोबत युती करत रणनीती आखली होती. त्यामुळे प्रत्येक गटातील लढत वेगळी आणि रंगतदार ठरली.

प्रमुख आणि लक्षवेधी लढती

1) विकास गोगावले (शिवसेना) मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विरुद्ध राष्ट्रवादीचे निलेश महाडिक

advertisement

2) चित्रा पाटील (भाजप) माजी मंत्री मिनाक्षीताई पाटील यांच्या सुन विरुद्ध रसिका केनी (शिवसेना शिंदे गट)

3) शर्मिला पाटील (भाजप) माजी मंत्री आणि आमदार रवीशेठ पाटील यांच्या सुन विरुद्ध पल्लवी भोईर (शिवसेना ठाकरे गट)

4) राजीव साबळे (राष्ट्रवादी अ. प.) माजी आमदार अशोक साबळे यांचे सुपुत्र विरुद्ध अविनाश नलावडे (शिवसेना शिंदे गट)

advertisement

5) भावना पाटील (भाजप) माजी आमदार पंडित पाटील यांच्या पत्नी विरुद्ध उर्वशी वाडकर शिवसेना आणि रोहिणी सकपाळ राष्ट्रवादी

6) मानसी दळवी (शिवसेना शिंदे गट) आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी विरुद्ध सानिका घरत.शेकाप

7) अमित मोरे (भाजप) माजी मंत्री प्रभाकर मोरे यांचे सुपुत्र विरुद्ध सोमनाथ ओझर्डे (शिवसेना ठाकरे गट)

8) आदिती दळवी (शिवसेना शिंदे गट) आमदार महेंद्र दळवी यांच्या सुन विरुद्ध

advertisement

09) राजेंद्र ठाकूर (काँग्रेस शेकाप युती उमेदवार) माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे सुपुत्र विरुद्ध भाजपचे दिलीप भोईर

10) नीलिमा पाटील (भाजप) खासदार धर्यशील पाटील यांच्या पत्नी विरुद्ध शर्मिला गोडके (शिवसेना शिंदे गट)

11) वैकुंठ पाटील (भाजप) भाजपचे आमदार रवीशेठ पाटील यांचे पुत्र (दादर जिप गट) विरुद्ध निखिल पाटील (शेकाप)

निवडणूक कार्यक्रम

अधिसूचना: 16 जानेवारी 2026

अर्ज दाखल: 16–21 जानेवारी

छाननी: 22 जानेवारी

माघार: 27 जानेवारी

प्रचार समाप्ती: 5 फेब्रुवारी (रात्री 10)

मतदान: 7 फेब्रुवारी 2026

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुढील 24 तास महत्त्वाचे, कल्याण-डोंबिवलीवर दुहेरी संकट, IMD नं दिला अलर्ट
सर्व पहा

मतमोजणी: 9 फेब्रुवारी 2026

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
रायगड ZP-PS निकाल 2026 LIVE : रायगडातून पहिले ३ निकाल आले हाती, कुणी मारली बाजी?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल