TRENDING:

VIDEO| मृत्यूच्या दारातून सुटका! मालेगाव महापालिकेची लिफ्ट पाचव्या मजल्यावरून कोसळली

Last Updated:

मालेगाव महानगरपालिकेतील लिफ्ट ओव्हरलोडमुळे पाचव्या मजल्यावरून खाली कोसळली, १५ ते १६ जण अडकले होते. सेफ्टी ब्रेकमुळे मोठा अनर्थ टळला, सर्वांची सुखरूप सुटका झाली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बब्बू शेख, प्रतिनिधी मालेगाव: मालेगाव महानगरपालिकेत महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक पार पडल्यानंतर काही वेळातच एक भीषण दुर्घटना घडली. महापालिकेची लिफ्ट ओव्हरलोड झाल्यामुळे पाचव्या मजल्यावरून थेट खाली कोसळली. या लिफ्टमध्ये नवनिर्वाचित पदाधिकारी आणि पत्रकारांसह १५ ते १६ जण अडकले होते. सुदैवाने, या मोठ्या अपघातात कोणालाही गंभीर इजा झाली नसून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.
News18
News18
advertisement

क्षमतेपेक्षा जास्त लोक अन् घात

मिळालेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या या लिफ्टची क्षमता केवळ ८ व्यक्तींची होती. मात्र, निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पाचव्या मजल्यावरून खाली येण्यासाठी लिफ्टमध्ये एकाच वेळी १५ ते १६ जण शिरले. क्षमतेपेक्षा दुप्पट वजन झाल्यामुळे लिफ्टची वायर अचानक तुटली आणि पाचव्या मजल्यावरून लिफ्ट वेगाने खाली आली. सुदैवाने सेफ्टी ब्रेकमुळे लिफ्ट दुसऱ्या मजल्यावर अडकली, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

advertisement

तळमजल्याचे गेट तोडून सुटका

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रताळ्यांचं गाव! महाशिवरात्रीला लाखात कमाई, शेतकऱ्यानं सांगितलं फायद्याचं गणित, V
सर्व पहा

लिफ्ट दुसऱ्या मजल्यावर अडकल्यानंतर आत असलेल्या लोकांचा श्वास गुदमरू लागला होता. तातडीने मदतकार्य राबवून तळमजल्याचे सुरक्षा गेट तोडण्यात आले आणि त्यानंतर सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. लिफ्टमधून बाहेर पडलेल्यांच्या चेहऱ्यावर मृत्यूच्या दाढेतून परतल्याची भीती स्पष्ट दिसत होती. इतके नगरसेवक आणि लोक लिफ्टमध्ये घुसले कसे? या घटनेमुळे सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मालेगावात अशा पद्धतीची दुर्घटना घडणं धोक्याचं आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
VIDEO| मृत्यूच्या दारातून सुटका! मालेगाव महापालिकेची लिफ्ट पाचव्या मजल्यावरून कोसळली
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल