TRENDING:

Amravati Accident: मेळघाटात भीषण अपघात, प्रवाशांनी खचाखच भरलेला पिकअप दरीत कोसळला, 5 जणांचा जागीच मृत्यू

Last Updated:

मेळघाटातील धारणी तालुक्यातून एक अतिशय भीषण अपघाताची बातमी समोर येत आहे. राणीगाव ते शिवाझीरी दरम्यान असलेल्या घाटात एक प्रवाशांनी भरलेली पिकअप गाडी ५० फूट खोल दरीत कोसळली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
संजय शेंडे, प्रतिनिधी अमरावती: मेळघाटातील धारणी तालुक्यातून एक अतिशय भीषण अपघाताची बातमी समोर येत आहे. राणीगाव ते शिवाझीरी दरम्यान असलेल्या घाटात एक प्रवाशांनी भरलेली पिकअप गाडी ५० फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला असून, १० ते १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक चर्चा परिसरात वर्तवली जात आहे.
News18
News18
advertisement

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, धारणी तालुक्यातील कंजोली येथील १५ ते २० नागरिक रविवारी मध्य प्रदेशातील देडतलई येथील आठवडी बाजारासाठी गेले होते. राणीगाव, सुसर्दा, शिवाझीरी, नारदु या मार्गे ते पिकअप वाहनाने बाजार आटपून सायंकाळच्या सुमारास परत येत होते. सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास राणीगाव ते शिवाझीरी घाटातील 'घोडादेव बाबा' मंदिराजवळ असलेल्या धामणनाला परिसरात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.

advertisement

रस्त्यावर असलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे पिकअप अनियंत्रित होऊन थेट ५० फूट खोल दरीत कोसळली. दरी खोल असल्याने आणि गाडीत प्रवाशांची संख्या जास्त असल्याने हा अपघात अत्यंत भीषण ठरला.

मृतांचा आकडा वाढण्याची भीती

या अपघातात कंजोली गावातील ५ नागरिकांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका पाचारण करण्यात आली. जखमींना तातडीने धारणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

advertisement

खड्ड्यांनी घेतला बळी?

स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे. राणीगाव, सुसर्दा, शिवाझीरी या मार्गावरील रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. याच खड्ड्यांमुळे पिकअप दरीत कोसळल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. या भागात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे रस्त्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उचलली लेखणी, पुण्यात 'हे' पहिल्यांदाच घडतंय, Video
सर्व पहा

घटनेचा पुढील तपास स्थानिक पोलीस करत असून, मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण मेळघाट परिसरात शोककळा पसरली आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Amravati Accident: मेळघाटात भीषण अपघात, प्रवाशांनी खचाखच भरलेला पिकअप दरीत कोसळला, 5 जणांचा जागीच मृत्यू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल