शिवसेना मनसेच्या युतीत मनसेला प्रभाग क्रमांत १९२ सुटला आहे. या ठिकाणाहून यशवंत किल्लेदार यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे. साहजिक प्रकाश पाटणकर यांचे तिकीट कापण्यात आले आहे. या ठिकाणाहून प्रिती प्रकाश पाटणकर यांनी मुंबई शहर महानगरपालिका निवडणूक २०१७ मध्ये लढवली आणि जिंकलीही होती.
उमेदवारीची आशा धूसर, शिंदे गटात प्रवेश करून तिकीट मिळवणार
advertisement
आपल्याला तिकीट मिळेल, अशी खात्री प्रकाश पाटणकर यांना होती. मात्र सेना-मनसेच्या युतीत हा प्रभाग मनसेला गेल्यानंतर पाटणकर यांच्या उमेदवारीची शक्यता धुसर झाल्याने त्यांनी संभाव्य शक्यतांची चाचपणी केली. एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क करून पक्ष प्रवेशाची आणि उमेदवारीची चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. सोमवारी दुपारी प्रवेश करून मंगळवारी ते निवडणूक अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मिळत आहे.
कोण आहेत प्रकाश पाटणकर?
प्रकाश पाटणकर हे आधी मनसेत होते, त्यांनी २०१६ ला शिवसेनेत प्रवेश केला
२०१७ सालच्या महानगर पालिकेत त्यांच्या पत्नी प्रिती पाटणकर यांनी १९२ मधून प्रतिनिधित्व केले
आठ वर्षानंतर होत असलेल्या निवडणुकीत सेनेकडून उमेदवारीची अपेक्षा त्यांनी होती
परंतु मनसेच्या यशवंत किल्लेदार यांना पक्षाने एबी फॉर्म दिला, साहजिक पाटणकर यांचे तिकीट कापण्यात आले
तिकीट मिळाल्याने यशवंत किल्लेदार यांना अत्यानंद
गेली अनेक वर्षे मी प्रभागात काम करतोय. आज पक्षाने मला उमेदवारी दिली. कष्टाचे चीज झाले. पक्षाचे आभार मानतो. इथल्या प्रभागाचे प्रतिनिधित्व करून प्रश्न सोडवेन, असे यशवंत किल्लेदार म्हणाले.
