बाबा जान उर्फ अब्दुल रशीद याने भूतप्रेत उतरवतो असे सांगून महिलेवर वारंवार बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. यासंदर्भात पीडित महिलेने सांताक्रूझ पोलिस ठाण्यात तक्रार केली.
महाराष्ट्र नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार बाबा जान याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलीच्या आजारपणाला कारण काळीजादू, नवऱ्यासोबतही त्यामुळेच भांडण, कारणं सांगून महिलेला भुलवली
advertisement
मुलीच्या आजारपणाला कारण हे काळीजादू असल्याचे सांगून बाबा जान याने महिलेला महाडला बोलावून पुन्हा पुन्हा अत्याचार केले. तुला भूताने झपाटल्याने तुझ्या नवऱ्याशी तुझे भांडण होत आहे.
तुझी मुलगी आजारी पडत आहे. तू पण आजारी पडशील, असे सांगून त्याने महिलेला भुलवल्याचे तिने पोलीस तक्रारीत म्हटले आहे.
पोलिसांकडून जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार बाबावर गुन्हा दाखल
जवळपास ऑगस्ट 2024 ते डिसेंबर 2024 या दरम्यान महाड, पनवेल, नवी मुंबई येथे बोलवून बाबाने अत्याचार केला, असे पीडित महिलेने पोलीस तक्रारीत म्हटले आहे. महाराष्ट्र नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार बाबा जान याच्यावर गुन्हा दाखल झाला असून मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष शमशुद्दीन तांबोळी यांनी पत्रक काढत समाजातील लोकांना अशा भोंदू बाबांपासून वाचण्याचे आवाहन केले आहे.
भोंदू अशोक खरात याचे प्रकरण राज्यात चर्चेत
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याने जवळपास १०० हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे प्रकरण चर्चेत आहे. नाशिक पोलिसांनी त्याच्यावर गुन्हे दाखल केले असून विशेष पोलीस पथकाकडून त्याची चौकशी सुरू आहे. गेल्या १५ दिवसांपासून लैंगिक अत्याचार प्रकरणात पोलीस त्याला बोलते करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याने शेकडो कोटींचे आर्थिक व्यवहार केल्याचा संशय आहे. त्यादृष्टीनेही त्याची चौकशी सुरू आहे.
