TRENDING:

BJP : रुग्ण नाही, तरीही सायरन जोरात! रुग्णवाहिकेचा बेकायदेशीर वापर, मुंबईत भाजप महिला नेता वादात, प्रकरण काय?

Last Updated:

Mumbai News : भाजप पदाधिकारी अक्षता तेंडुलकर पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत.तेंडुलकर यांनी रुग्णवाहिकेचा (Ambulance) बेकायदेशीर वापर केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: भाजप पदाधिकारी अक्षता तेंडुलकर पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत.तेंडुलकर यांनी रुग्णवाहिकेचा (Ambulance) बेकायदेशीर वापर केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. दादरच्या गजबजलेल्या मार्केटमध्ये कोणतीही आपत्कालीन स्थिती किंवा रुग्ण नसताना केवळ सायरन वाजवत रुग्णवाहिका फिरवल्याने तेंडुलकर यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. याप्रकरणी आता मुंबई वाहतूक पोलीस कडक कारवाई करण्याची शक्यता आहे.
रुग्ण नाही, तरीही सायरन जोरात! रुग्णवाहिकेचा बेकायदेशीर वापर, मुंबईत भाजप महिला नेता वादात, प्रकरण काय?
रुग्ण नाही, तरीही सायरन जोरात! रुग्णवाहिकेचा बेकायदेशीर वापर, मुंबईत भाजप महिला नेता वादात, प्रकरण काय?
advertisement

नेमका प्रकार काय?

मिळालेल्या माहितीनुसार, अक्षता तेंडुलकर यांनी दादर परिसरात मागील काही वर्षात फेरीवाल्यांच्या विरोधात आंदोलन पुकारले आहे. दादरमधील फेरीवाल्यांमध्ये बांगलादेशी असल्याच्या संशयातून त्यांनी एकाला मारहाण केल्याचा प्रकारही समोर आला होता. त्यानंतर आता त्यांनी फेरीवाल्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी दाखवण्यासाठी चक्क एका रुग्णवाहिकेचा वापर स्वतःच्या प्रवासासाठी केला. धक्कादायक म्हणजे, या रुग्णवाहिकेत कोणताही रुग्ण नव्हता किंवा कोणतीही वैद्यकीय आपात्कालीन स्थिती नव्हती. तरीही दादर मार्केटसारख्या अतिशय गर्दीच्या ठिकाणी मोठ्या आवाजात सायरन वाजवत ही रुग्णवाहिका फिरवण्यात आली.

advertisement

कायद्याचे उल्लंघन?

रुग्णवाहिका ही केवळ रुग्णांच्या सेवेसाठी आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी असते. रुग्णवाहिकेत रुग्ण नसताना सायरन वाजवणे हा कायदेशीर गुन्हा आहे. अक्षता तेंडुलकर आणि त्यांचे कार्यकर्ते या रुग्णवाहिकेत बसून फिरत असताना सायरनचा वापर केल्याने वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवण्यात आल्याचा आरोप होत आहे.

मुंबई पोलीस घेणार ॲक्शन!

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात मोठी वाढ, तूर आणि कांद्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

या घटनेचा व्हिडिओ आणि माहिती समोर आल्यानंतर मुंबई वाहतूक पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आहे. रुग्णवाहिकेचा असा गैरवापर करणे बेकायदेशीर असल्याने अक्षता तेंडुलकर यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली असल्याचे समजते.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BJP : रुग्ण नाही, तरीही सायरन जोरात! रुग्णवाहिकेचा बेकायदेशीर वापर, मुंबईत भाजप महिला नेता वादात, प्रकरण काय?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल