TRENDING:

घराला तडे गेलेत, तुला सोडणार नाही! माणगावमध्ये ग्रामस्थांचा संताप; कामगाराला बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल

Last Updated:

व्हायरल व्हिडिओमध्ये काही व्यक्ती कामगारावर ओरडताना आणि मारहाण करताना दिसत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
रायगड:  मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरून माणगाव तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठेकेदार कंपनीच्या एका कामगाराला बेदम मारहाण करण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली आहे. पवन कुमार असे जखमी कामगाराचे नाव असून या मारहाणीमध्ये त्याच्या कानाला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे. या घटनेमुळे महामार्ग प्रकल्पाच्या ठिकाणी भीतीचे वातावरण पसरले आहे.
Mumbai-Goa Highway ची नवी डेडलाईन, 13 तासांचा प्रवास 6 तासांवर; रस्त्याला इतका वेळ का? खरं कारण आलं समोर!
Mumbai-Goa Highway ची नवी डेडलाईन, 13 तासांचा प्रवास 6 तासांवर; रस्त्याला इतका वेळ का? खरं कारण आलं समोर!
advertisement

माणगाव येथे जय भारत या ठेकेदार कंपनीमार्फत मुंबई–गोवा महामार्गाच्या बायपास रस्त्याचे काम सुरू आहे. या कामादरम्यान सुरुंगाच्या स्फोटामुळे परिसरातील काही घरांना तडे गेले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याच कारणावरून संतप्त ग्रामस्थांनी ठेकेदार कंपनीच्या कार्यालयात धडक देत जोरदार संताप व्यक्त केला. कार्यालयात उपस्थित असलेल्या पवन कुमार याला जिवे ठार मारण्याची धमकी देत अश्लील शिवीगाळ करण्यात आली आणि त्यानंतर त्याच्यावर हल्ला करण्यात आला.

advertisement

कामगाराच्या कानाला गंभीर दुखापत

या हल्ल्यात पवन कुमार याच्या कानाला गंभीर दुखापत झाली असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेदरम्यान झालेल्या शिवीगाळीचा आणि मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून, त्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये काही व्यक्ती कामगारावर ओरडताना आणि मारहाण करताना दिसत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

advertisement

तक्रारींचीही स्वतंत्र चौकशी करण्यात येणार,पोलिसांची माहिती

घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी आणि ग्रामस्थ दोन्ही पक्ष माणगाव पोलिस ठाण्यात हजर झाले. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून पोलिसांनी संबंधित व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. सुरुंगाच्या स्फोटामुळे घरांचे नुकसान झाले असल्याच्या तक्रारींचीही स्वतंत्र चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

advertisement

दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

दरम्यान, महामार्ग प्रकल्पाच्या कामादरम्यान सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन होणे आवश्यक असून, नागरिकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होता कामा नये, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे. दुसरीकडे, कामगारांवर हल्ला करणे कोणत्याही परिस्थितीत योग्य नसल्याचे सांगत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी ठेकेदार कंपनीकडून करण्यात आली आहे.

advertisement

परिसरात तणावाचे वातावरण

या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून, पुढील अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांकडून अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

हे ही वाचा :

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उचलली लेखणी, पुण्यात 'हे' पहिल्यांदाच घडतंय, Video
सर्व पहा

Mumbai-Goa Highway ची नवी डेडलाईन, 13 तासांचा प्रवास 6 तासांवर; रस्त्याला इतका वेळ का? खरं कारण आलं समोर!

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
घराला तडे गेलेत, तुला सोडणार नाही! माणगावमध्ये ग्रामस्थांचा संताप; कामगाराला बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल