परिणय फुके यांची आई अंधारे आणि खडसेंना म्हणाली...
सुषमा अंधारे आणि रोहिणी खडसे यांनी एका महिलेची एकच बाजू समजून घेतली. मी सुद्धा महिला, आई आहे. माझ्यावर आणि आमच्या कुटुंबावर आरोप करण्यापूर्वी त्यांनी माझ्याशी चर्चा केली असती किंवा मला एका शब्दाने सुद्धा विचारले असते तर त्यांना या प्रकरणातली वस्तुस्थिती मी सांगितली असती आणि त्यानंतर त्याचे डोळे उघडले असते.
advertisement
आमच्या घरगुती वादाबद्दल अंधारे आणि खडसे यांनी आमच्या कुटुंबियांवर केलेले आरोप दुर्दैवी आणि समाजाची दिशाभूल करणारे आहेत. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्याने काही अधिक बोलणे हा न्यायालयाचा अपमान होईल. पण जेव्हा आमच्या कुटुंबाची बदनामी करण्याचे प्रयत्न केले जातात, तेव्हा त्याबद्दल काही गोष्टी समाजासमोर आणणे आवश्यक ठरते.
मी माझा तरूण मुलगा गमावला आहे. त्या दु:खातून आम्ही अजूनही बाहेर पडलेलो नाहीत. मुलांना संकेत याचे निधन झाल्यानंतर आम्ही आमची सूनबाई प्रिया आणि आमच्या दोन्ही नातवंडांना आनंदात ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांना कुठल्याही गोष्टीची उणीव जाणवू नये यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करीत होतो. पण आमच्या नशिबात ते नव्हते.
माझे पती रमेश फुके आजारी असतात. त्यांना दोन्ही नातवंडांना भेटायची इच्छा होते. ते सुनेला हात जोडून विनंती करतात. पण नातवंडांना भेटू दिले जात नाही. काही अटींवर एकावेळी भेट घडवून दिली जाते. त्या अटी सांगितल्या तर मनस्ताप होईल.
सून प्रिया यांना कोणत्या गोष्टींचा राग आहे, तिला कोणता बदल हवा आहे, हे अजूनही आम्हाला कळलेले नाही. कुटुंबात एकत्र बसून वाद संपवण्याचे आम्ही सर्वांनी प्रयत्न केले. पण दुर्दैवाने आम्ही अपयशी ठरलो. आमची बदनामी करून त्यांना काम मिळत असेल ते देवच जाणो. आमच्याकडे प्रत्येक वेळी पैशाची मागणी केली जाते, आम्ही ती पूर्ण सुद्धा करतो. पण आमच्या कुटुंबात शांती राहू नये, असेच प्रयत्न केले जातात, असे सांगून आपल्यावरील आरोप फुके कुटुंबाने फेटाळून लावले आहेत.
