राज ठाकरे यांनी बदलापूर अत्याचार प्रकरणावर भाष्य करताना म्हटलं की, बदलापूरमध्ये जे झालं त्याला वाचा मनसेने फोडली. यातील आरोपीला कडक शिक्षा व्हायला हवी. रांझ्याच्या पाटलाचे हात पाय कापून चौरंग केला तसा याचा चौरंग करायला पाहिजे असं राज ठाकरे म्हणाले. जाहीर सभेत राज ठाकरेंनी बदलापूर प्रकरणावर मत व्यक्त केलं.
महाराष्ट्र बंद विरोधात सदावर्तेंची याचिका, हायकोर्टाची याचिकाकर्त्यांना तंबी; म्हणाले, राजकीय...
advertisement
विधानसभा निवडणुकीबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, यावेळीच्या निवडणूक मध्ये 200 ते 225 उमेदवार उभे करणार आहे. उन्हात उभं राहून लोक मतदान करतात आणि हे विकले जातात. कोण कोणत्या पक्षात हे समजत नाही. या गोष्टीचा राग तुम्हाला आला पाहिजे आणि या निवडणुकीत तुम्ही तो राग व्यक्त करा, नाही तर प्रश्न सुटणार नाही.
राज ठाकरेंनी वणी विधानसभा मतदारसंघात मनसेच्या उमेदवाराची घोषणाही केली. ते म्हणाले की, वणी विधानसभा क्षेत्रात राजू उंबरकर हा आमचा उमेदवार असेल. पूर्ण ताकदीने राजू उंबरकरच्या मागे राहा आमदार म्हणून त्याला पाठवा. मी कशे प्रश्न सोडवतो तुम्हाला माहिती आहे. पाहिले हाथ जोडून जातो मग हाथ सोडून जातो. येणाऱ्या निवडणुकीनंतर आपली सत्ता असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
