नांदेडच्या गँगवॉरचा खरतनाक इतिहास
गोदाकाठी वसलेलं नांदेड शहर एकीकाळी शांत शहर होतं. जिल्ह्याला क्राईम रेट देखील खूप कमी होता. छोटे मोठे भाई, आप आपल्या भागात भाईगिरी करायचे , मात्र 2016 साली कुख्यात दहशदवादी हरविंदर सिंग संधू उर्फ रिंदा याची नांदेडमध्ये एन्ट्री झाली. रिंदा हा मूळचा नांदेडचा, पण 2016 पर्यंत तो पंजाब राज्यात सक्रीय गुन्हेगारीत होता. नांदेडमध्ये रिंदाच्या भावाची हत्या झाली. भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी रिंदा नांदेडला आला. भावाचा मारेकरी असल्याच्या संशयावरून रिंदा आणि त्याच्या दोन साथीदारांनी 2016 साली बच्छिंदर सिंघ माळी यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या केली. त्या घटनेने नांदेड शहर हादरले.
advertisement
माळी यांच्या हत्येच्या दोन दिवसानंतर रिंदा याने एका कार्यक्रमस्थळी जाऊन एका तरुणाची हत्या केली. पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून रिंदाने दुसरा खून केला. त्यानंतर रिंदा फरार झाला, मात्र नांदेड शहरात त्याची गँग सक्रीय झाली. 2016 ते 2022 पर्यंत रिंदाच्या गँगने शहरात उच्छाद मांडला. खंडणी गोळा करणे , धमकावणे , गोळीबार करणे असे प्रकार नित्याचे झाले. रिंदा गँगच्या दहशतीमुळे अनेक व्यापारी , उद्योजकांनी शहर सोडलं होतं. पोलिसांकडून वेळोवेळी कारवाया झाल्या. पण नवनवीन तरुण रिंदाच्या गँगमध्ये सहभागी व्हायचे. खंडणी न दिल्याने रिंदाच्या दोन शूटरनी नांदेडमधील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची गोळ्या झाडून हत्या केली. एप्रिल 2022 साली संजय बियाणीची हत्या झाली. त्यानंतर पोलीसांनी कठोर कारवाई करत 18 जणांना अटक केली. संजय बियाणी यांच्या हत्येनंतर वर्षभरात पोलिसांनी रिंदा गँगला पायबंध घालून त्यांची दहशद संपवली.
रिंदा गँग सक्रीय असताना नांदेड शहरात कैलाश बिगानिया आणि विक्की चव्हाण ह्या दोन गँगनी देखील अनेक गुन्हे केले. 2018 ते 2020 पर्यंत कैलाश बिगानिया आणि विक्की चव्हाण यांच्या गँग सक्रिय होत्या. मात्र या दोन्हीं गँगमध्ये टोकाचे शत्रुत्व होते. त्यातून ऑगस्ट 2020 साली कैलाश बिगानिया आणि त्याच्या साथीदारांनी विक्की चव्हाण याचे अपहरण करुन त्याची निर्घृण हत्या केली.
नांदेडमध्ये दोन गँग भिडल्या, तिघांचा मृत्यू
पोलिसांनी बिगानिया गँगवर खून आणि मोक्का सारखे गुन्हे दाखल करुन त्यांना तुरंगात पाठवले. वर्षभरानंतर जुलै 2021 साली विक्की चव्हाण याचा साथीदार विक्की ठाकूर याची हत्या करण्यात आली. बिगानिया गँगने विक्की ठाकूर याची हत्या केल्याचा आरोप आहे. या गँगवॉरमुळे पोलीस ॲक्शन मोडवर आले. 2021 ते 2024 तीन वर्षात पोलिसांनी एका गुंडांचे एन्काऊंटर केले. शिवाय वेगवेगळ्या घटनेत नऊ गुंडावर गोळीबार केला. शिवाय मोक्कका, एमपीडीए, हद्दपारी सारख्या कारवाया झाल्याने नांदेडमध्ये गुन्हेगारी कमी झाली.
नांदेड शांत झाले असे वाटत असताना मात्र काल शुक्रवारी रात्री नांदेड शहरात दोन गँग आपसात भिडल्या. या गँगवारमध्ये तिघांचा मृत्यू झाला. अनिल पंजाबी उर्फ सदा गँग आणि साई लाला गँगमध्ये वर्चस्व वादातून तिघांचा मृत्यू झाला. सदा गँगचा अर्जित सिंघ चव्हाण आण साई लाला गँगचे महोमद अरबाज आणि सय्यद आवेझ असे तीन गुंड ठार झाले. या गँगवॉरनंतर पोलीस दल सक्रीय झाले असून गुन्हेगारांनी पुन्हा डोके वर काढल्याने पोलिसांना आता कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे.
