प्रसाद शिंदे , कृष्णा जोगदंड , रवी लोट या तिघांना अटक करण्यात आली. एक आरोपी अंकुश गंदमवार हा नांदेड शहराजवळच्या झरी गावाच्या शिवारात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार एलसीबीचे पथक तिथे पोहचले.
आरोपीच्या पायावर गोळी झाडून घायाळ केलं!
पोलिसांना पाहून अंकुश गंदमवार शेतात पळाला. पोलिसांनी पाठलाग सुरू केला. तेव्हा आरोपी अंकुश गंदमवार याने पोलिसांवर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. पण फायर झालं नाही , त्याने पुन्हा फायर करण्याचा प्रयत्न करत असताना पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे यांनी आकाश गंदमवार याच्यावर गोळी झाडली. त्याच्या पायाला गोळी लागली. जखमी अवस्थेत अंकुश गंदमवार याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
advertisement
नवरात्रीच्या काळात वाद, तिथेच संघर्षाला सुरुवात
दरम्यान आरोपी आणि सोनु कल्याणकर यांच्यात नवरात्रीच्या काळात वाद झाला होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वी देखील त्यांच्यात वाद झाला होता. त्याच रागातून सोनु कल्याणकर याचा खून करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सांगितले. शिवाय या खूनाचे आणखी काही कारण आहे का , आणखी कोणी सहभागी आहे का? याचा तपास सुरू आहे.
रिंदा गँगचा सदस्य गोलू मंगनाळे याने सोनु कल्याणकरवर गोळीबार केला होता
2021 साली रिंदा गँगचा सदस्य गोलू मंगनाळे याने सोनु कल्याणकर याच्यावर गोळीबार केला होता. त्यात सोनु कल्याणकर बचावला होता. सध्या गोलू मंगनाळे तुरुंगात आहे. मात्र या खून प्रकरणात गोलू मंगनाळे याचा काही सहभाग आहे का याचाही तपास केला जात आहे. मयत सोनू कल्याणकर याची देखील गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे पोलिसांनी सांगितले. सोनु कल्याणकर यांच्यावर सात गुन्हे दाखल आहेत . तर आरोपी अंकुश गंदमवार हा देखील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या वर देखील अनेक गुन्हे दाखल आहेत.
