TRENDING:

व्हिडीओ बाहेर आले खरे पण अशोक खरातचा खरा धंदा वेगळाच होता, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर

Last Updated:

दहावी नापास असलेला भोंदूबाबा अशोक खरातने शेकडो कोटींची मालमत्ता कशी जमवली, याचा शोध घेत असताना पोलिसांना चौकशीत काही धक्कादायक माहिती मिळाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिक : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याने भक्तांच्या धार्मिक श्रद्धेचा गैरफायदा घेऊन महिलांचे लैंगिक शोषण, नेत्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून पैसे उकळणे असे अनेक उद्योग केले. राजकारण, समाजकारण, प्रशासन अशा सगळ्याच क्षेत्रातील दिग्गज लोकांची उठबस खरातसोबत असल्याने त्याच्या नादी लागायला नको, असे म्हणून पीडितांनी तक्रारी करणे टाळले. परंतु मागील १५ दिवसात त्याच्या गुन्ह्याची कुंडली समोर आली आहे. विशेष पोलीस पथकाकडून त्याची गेल्या १४ दिवसांपासून चौकशी सुरू आहे. या पोलीस तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आलेल्या आहेत.
अशोक खरात
अशोक खरात
advertisement

दहावी नापास असलेला भोंदूबाबा अशोक खरातने शेकडो कोटींची मालमत्ता कशी जमवली, याचा शोध घेत असताना पोलिसांना चौकशीत काही धक्कादायक माहिती मिळाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. अशोक खरात याने जवळच्या लोकांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेऊन अनेक कारनामे केले आहेत. नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील दोन पतसंस्थेत अशोक खरात याने दुसऱ्यांच्या आधार कार्ड आणि पॅनकार्डचा गैरफायदा घेऊन जवळपास १०० हून अधिक खाती उघडून त्याद्वारे शेकडो कोटींचे व्यवहार केले आहे.

advertisement

अशोक खरातचा खरा धंदा वेगळाच होता, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर

विशेष पोलीस पथकाच्या चौकशीत, नाशिकमधील जगदंब पतसंस्था आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील समता पतसंस्थेत अशोक खरात हा जवळपास १०० वेगवेगळ्या खातेदारांना नॉमिनी (वारसदार) आहे. विशेष म्हणजे ही खाती एकाच दिवशी उघडण्यात आल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी पोलिसांनी पतसंस्थेतील खातेदारांना चौकशीसाठी बोलवले होते. त्यावेळी आमची कागदपत्रे वापरून त्याने ही खाती उघडली असावीत, असे सात खातेदारांनी सांगितले. कागदपत्रे जरी खरी असली तरी स्वाक्षरी बनावट असल्याचे संबंधित खातेदारांनी सांगितले. तसेच खात्यातील पैशांवरही आमचा कोणत्याही प्रकारचा दावा नसेल, असेही त्यांनी सांगितले.

advertisement

आम्ही कोणतीही कागदपत्रे स्वतःहून दिली नाहीत. खात्यांवरील स्वाक्षरी आमची नाही. या खात्यावर आम्ही कधीही व्यवहार केलेले नाहीत. खाते उघडताना वापरलेले आधार कार्ड आणि पॅन कार्ड आमचीच आहेत. मात्र सह्या आमच्या नाहीत, असे खातेदारांनी अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांना सांगितले. त्यावेळी अशोक खरात यानेच इतरांची कागदपत्रे वापरून ही खाती परस्पर उघडल्याचा संशय पोलिसांना आहे.

advertisement

सगळे व्यवहार अशोक खरात हाताळायचा

महत्त्वाचे म्हणजे अशोक खरात स्वतःच सगळे व्यवहार हाताळत होता. इतकेच काय तर खरात याचाचा मोबाईल नंबर सगळ्या खात्यांना लिंक होता. दोन्ही पतसंस्थेचे चेअरमन आणि मॅनेजर यांची विशेष पोलीस पथकाकडून चौकशी सुरू आहे.

याचाच अर्थ अशोक खरात महिलांचे लैंगिक शोषण करत होता. पण, हे सगळे मजा म्हणून तो करीत होता. त्याचा खरा धंदा हा भक्तांकडून आलेल्या पैशांतून संपत्ती जमा करणे, भक्तांच्याच नावाने खाती उघडून त्यातून शेकडो कोटींचे आर्थिक व्यवहार करणे, कोट्यवधींचे भूखंड बळकावणे, पूजेच्या नावाखाली विदेशात फिरणे हा होता.

advertisement

रुपाली चाकणकर यांच्या बहिणीचेही पतसंस्थेत खाते

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरीमधून घर खर्च भागत नव्हता, दाम्पत्याने सुरू केला चपाती आणि भाकरी व्यवसाय, महिन्याची कमाई पाहाच
सर्व पहा

जगदंबा पतसंस्था आणि समता पतसंस्थेत अशोक खरात हा शेकडो खात्यांचा नॉमिनी (वारसदार) आहे. धक्कादायक बाब म्हणजे रुपाली चाकणकरांच्या बहिणीच्या नावानेही खाते उघडण्यात आले होते. प्रतिभा गणेश चाकणकर यांच्या नावाने असलेल्या खात्यातून ४० ते ५० कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
व्हिडीओ बाहेर आले खरे पण अशोक खरातचा खरा धंदा वेगळाच होता, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल