मुलीचं लग्न सोडून मतदानाला
भाजपच्या नगरसेविका इंदूती खेताडे यांच्या मुलीचे आज दुपारी १२:३० वाजता लग्न होतं. मात्र आपलं कर्तव्य म्हणून त्यांनी थोड्या काळासाठी लग्न सोडून मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याला पसंती दिली. त्या आल्या मतदान केलं आणि पुन्हा मुलीच्या लग्नासाठी गेल्या. त्याच्या या कामगिरीचे पक्षासह नागरिकांकडून कौतुक होत आहे.
महापालिकेत महायुतीचे सत्तास्थापन
advertisement
नव्या सत्तारचनेनुसार भाजप, शिंदे गटाची शिवसेना, अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे हे पक्ष सत्तेत सहभागी होणार आहेत. या घडामोडींमुळे नाशिक महापालिकेतील सत्तेचे गणित स्पष्टपणे भाजपच्या बाजूने झुकले आहे. विशेष म्हणजे निवडणुकीपूर्व काळात एकमेकांवर जोरदार टीका करणारे हे पक्ष आता एकत्र सत्तेत सहभागी झाले आहेत, यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
भाजपकडे महापौरपद तर शिंदे गटाच्या शिवसेनेकडे उपमहापौरपद देण्यात आले आहे. त्यानुसार हिमगौरी आडके महापौरपदी तर विलास शिंदे उपमहापौरपदी विराजमान झाले आहेत.
महापालिका निवडणुकीचा निकाल काय होता?
अलीकडील महापालिका निवडणुकीत भाजपने सर्वाधिक ७२ जागा जिंकत आपले वर्चस्व कायम राखले. शिंदे गटाच्या शिवसेनेने २६ जागा मिळवल्या, तर ठाकरे गटाच्या शिवसेनेला १५ जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसला केवळ ३ जागा मिळाल्या असून, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ४ जागा जिंकल्या आहेत. मनसेला १ जागा मिळाली असून, एका जागेवर अपक्ष नगरसेवक निवडून आला आहे.
