समोर आलेल्या माहितीनुसार, मनमाडमध्ये झालेल्या अत्याचाराच्याघटनेन् शहर हादरले आहे. या प्रकरणी पोलिसांनी 64 वर्षीय बाबा भागवत या आरोपीला अटक करून त्याच्या विरुद्ध ऍट्रॉसिटी आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या नराधमाने एका 7 वर्षीय मुलावर अत्याचार केला शिवाय त्याची शहरातील एका भागात असलेली लॉन्ड्रीच्या दुकानात प्रेस करण्यासाठी कपडे घेऊन येणाऱ्या लहान मुलांशी अश्लील चाळे करून लैंगिक अत्याचार करीत असल्याचे डिवायएसपी बाजीराव महाजन यांनी सांगितले.
advertisement
आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी
आरोपी बाबाचे लॉन्ड्रीचे दुकान आहे. या दुकानात जी लहान मुले कपडे घेऊन येत असे त्या मुलांसोबत अश्लील चाळे करणे, त्यांना जवळ घेणे,अनैसर्गिक पद्धतीचे चाळे करत असे. हे प्रकरण समोर आल्यानंतर फिर्यादीने पोलीस स्थानकात धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ नराधमाला अटक केली असून फॉरेन्सिक टीमला पाचारण केले. फॉरेन्सिक टीमने पुरावे गोळा केले असून आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.
नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन
तसेच घडलेल्या प्रकारानंतर मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. तसेच नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. कोणताही अनुचीत प्रकार घडू नये याकरता पोलिसांनी या परिसरात गस्त वाढवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मालेगावमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी
15 नोव्हेंबर रोजी माणुसकीला काळीमा फासणारी घटना नाशिक जिल्ह्यातील मालेगाव इथं डोंगराळे गावात घडली होती. एका 24 वर्षीय नराधमाने ३ वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिचा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून केला. विजय संजय खैरनार असं या नराधम आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी या नराधमाला अटक केली आहे. पण, किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचा बदला म्हणून त्याने हे कृत्य केल्याचं समोर येताच कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. आरोपी विजय खैरनारला आमच्या ताब्यात द्या, गावातच त्याला फासावर लटकवू, अशी संतप्त प्रतिक्रिया मृत मुलीचे वडील आणि नातेवाईकांनी दिली.
हे ही वाचा :
