दिवाळीला 2 दिवसांसाठी नेलं अन् नांदायला पाठवलंच नाही, नगरमध्ये लव्ह मॅरेज केलेल्या तरुणासोबत घडलं भयंकर
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
प्रेमविवाह केल्यानंतर सासरच्यांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून अहिल्यानगर शहरात एका ३२ वर्षीय नवविवाहित तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे.
अहिल्यानगर: प्रेमविवाह केल्यानंतर सासरच्यांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून अहिल्यानगर शहरात एका ३२ वर्षीय नवविवाहित तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी (४ डिसेंबर) घडली. प्रेमविवाहास तीव्र विरोध असलेल्या सासू-सासऱ्यांनी दिवाळीच्या निमित्ताने मुलीला माहेरी घेऊन गेले आणि तिला पुन्हा सासरी नांदायला पाठवण्यास नकार दिला, तसेच तरुणाचा मानसिक छळ केल्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आलं आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणाने एक सुसाईड नोट लिहून ठेवली आहे, तसेच आपल्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ देखील तयार केला आहे. या चिठ्ठीत आणि व्हिडीओत त्याने आत्महत्येमागील नेमकं कारण स्पष्ट केलं आहे. त्याने आपल्या आत्महत्येसाठी सासू-सासऱ्यांना जबाबदार धरलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाने एप्रिल महिन्यात प्रेमविवाह केला होता. परंतु, त्याच्या या विवाहास त्याच्या पत्नीच्या आई-वडिलांचा तीव्र विरोध होता. दिवाळीच्या काही दिवस आधी ते तरुणाच्या घरी आले आणि त्यांनी 'लग्नानंतर मुलीची पहिलीच दिवाळी आहे. मुलीला माहेरी घेऊन जातो आणि दोन दिवसांनी तिला परत आणून सोडतो,' असं सांगून ते मुलीला सोबत घेऊन गेले. मात्र, त्यानंतर त्यांनी ठरल्याप्रमाणे मुलीला तिच्या सासरी नांदायला पाठवलं नाही. वारंवार मुलीची पाठवणी करण्यास सांगूनही त्यांनी यास नकार दिला आणि तरुणाचा मानसिक छळ सुरूच ठेवला.
advertisement
या त्रासाला कंटाळून अखेर तरुणाने गुरुवारी राहत्या घरी गळफास लावून आपलं जीवन संपवले. या घटनेनंतर मृत तरुणाच्या बहिणीने तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तरुणाच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी त्याच्या सासू-सासऱ्यांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या सुसाईड नोट आणि व्हिडिओच्या आधारावर पुढील तपास करत आहेत.
view commentsLocation :
Ahmadnagar (Ahmednagar),Ahmadnagar,Maharashtra
First Published :
December 07, 2025 9:21 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दिवाळीला 2 दिवसांसाठी नेलं अन् नांदायला पाठवलंच नाही, नगरमध्ये लव्ह मॅरेज केलेल्या तरुणासोबत घडलं भयंकर


