TRENDING:

नाशिकमध्ये भरधाव कारने व्यावसायिकाला उडवलं, 200 फूट नेलं फरपटत, जागीच मृत्यू

Last Updated:

मुंबई-आग्रा महामार्गावर ओझर येथील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ एका भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी नाशिक: मुंबई-आग्रा महामार्गावर ओझर येथील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ एका भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली असून, त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. हा अपघात इतका भीषण होता की, कारने दुचाकीला धडक दिल्यानंतर दुचाकीस्वाराला सुमारे २०० फुटांपर्यंत फरपटत नेलं.
nashik accident hotel owner death
nashik accident hotel owner death
advertisement

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, काबुल शेख (४०-४५ वर्षे) हे व्यावसायिक असून, ते ओझर परिसरात हॉटेल चालवायचे. शनिवारी रात्री काम आटोपून ते आपल्या भाचीला दुचाकीवर बसवून घरी परतत होते. मुंबई-आग्रा महामार्गावरून जात असताना रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ मागून भरधाव वेगाने आलेल्या एका कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील काबुल शेख आणि त्यांची भाची हवेत उडून रस्त्यावर फेकले गेले.

advertisement

दुचाकीला २०० फूट फरपटत नेलं

कारचा वेग अत्यंत जास्त होता. त्यामुळे कारने धडक दिल्यानंतर दुचाकीला तब्बल २०० फुटांपर्यंत फरपटत गेले. या अपघातात शेख यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर सोबत असलेली त्यांची भाची देखील गंभीर जखमी झाली असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतं. घटनेची माहिती मिळताच ओझर पोलीस स्टेशनचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून, अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूचे दरात पुन्हा तेजी, कांद्या आणि केळीला काय मिळाला आज भाव? इथं चेक करा
सर्व पहा

एका हॉटेल व्यवसायिकाचा अशाप्रकारे अपघातात मृत्यू झाल्याने ओझर परिसरात शोककळा पसरली आहे. रात्रीच्या वेळी महामार्गावर होणाऱ्या वेगामुळे सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस आता परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून नेमका अपघात कसा घडला? याची माहिती गोळा केली जात आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
नाशिकमध्ये भरधाव कारने व्यावसायिकाला उडवलं, 200 फूट नेलं फरपटत, जागीच मृत्यू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल