मिळालेल्या माहितीनुसार, दिंडोरी तालुक्यातील इंदोरे येथील रहिवासी असलेलं दरगोडे कटुंब शुक्रवारी दिंडोरी शहरातील खासगी क्लासच्या गेट टुगेदर पार्टीला आलं होतं. याठिकाणी गेट टुगेदरची पार्टी आटोपून घरी दरगोडे कुटुंब इर्टिगा कारने आपल्या घरी जात होता. दरम्यान, शिवाजीनगर परिसरातून जात असताना त्यांची कार राजेंद्र राजे यांच्या विहिरीत जाऊ कोसळली. यात विद्यार्थी आणि पालक असे एकूण 9 जण ठार झाले.
advertisement
दिंडोरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात शुक्रवारी रात्री दहा ते साडेदहाच्या सुमारास घडला. अपघाताची माहिती मिळताच दिंडोरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र विहिरीत अंधार आणि खोल पाणी होतं. त्यामुळे बचावकार्यात अडचणी आल्या. त्यामुळे पोलिसांनी दोन हायड्रा क्रेन आणि गावातील पोहणाऱ्या व्यक्तींना बोलवून बचावकार्य केलं. रात्री सव्वा बाराच्या सुमारास क्रेनच्या मदतीने कार बाहेर काढण्यात आली. यात नऊ जणांचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं.
मृतांची नावं
१) रेश्मा सुनील दरगुडे वय २७
२) आशा अनिल दरगुडे वय ३२
३) खुशी/शृष्टीअनिल दरगुडे वय १४
४) श्रेयस अनिल दरगुड वय ११
५) राखी सुनील दरगुडे वय ११
६) श्रावणी अनिल दरगुडे ११
७) समृद्धी राजेंद्र दरगुडे वय ७
८) माधुरी अनिल दरगुडे वय १३
९) सुनील दत्तू दरगुडे वय ३२
सर्व मृत हे नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्याती इंदोरे येथील रहिवासी आहेत. सदरची गाडी आणि सर्व मृतदेह लोकांच्या मदतीने विहिरीच्या बाहेर काढून शासकीय रुग्णालय दिंडोरी येथे आणले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई केली जात आहे. गेट टुगेदरला गेलेल्या एकाच कुटुंबातील नऊ जणांचा अशाप्रकारे अंत झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
