TRENDING:

ज्याला जीव लावला त्यानेच पोत्यात भरलं अन्....नाशिकच्या नर्सची मर्डर मिस्ट्री उलगडली

Last Updated:

नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेऊनही त्या न सापडल्याने अखेर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातून एक हृदयद्रावक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. गेल्या 15 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका नर्सचा मृतदेह विहिरीत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अनैतिक प्रेमसंबंधातून हा निर्घृण खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले असून, निफाड पोलिसांनी आरोपी प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत.
News18
News18
advertisement

निफाड तालुक्यातील देवपूर परिसरातून 15 दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या रंभाबाई काळे या महिलेची हत्या झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. एका खाजगी रुग्णालयात परिचारिका म्हणून सेवा बजावणाऱ्या रंभाबाई यांचा त्यांच्याच प्रियकराने गळा आवळून खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकून दिला. याप्रकरणी निफाड पोलिसांनी वेगाने तपास चक्रे फिरवून आरोपी अरुण ढेपले याला अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

advertisement

पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीची कबुली

रंभाबाई काळे या गेल्या 15 दिवसांपासून अचानक घरातून बेपत्ता झाल्या होत्या. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेऊनही त्या न सापडल्याने अखेर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे रंभाबाई यांच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती घेतली असता अरुण ढेपले याच्यावर संशय बळावला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच त्याने रंभाबाई यांची हत्या केल्याची कबुली दिली.

advertisement

नेमकं काय आहे प्रकरण? 

मिळालेल्या माहितीनुसार, रंभाबाई आणि अरुण यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र, काही कारणास्तव त्यांच्यात वाद झाला आणि त्यातूनच अरुणने रंभाबाई यांचा गळा आवळून जीव घेतला. हत्या केल्यानंतर पकडले जाऊ या भीतीने त्याने मृतदेह एका पोत्यात भरला. मृतदेह पाण्यावर तरंगू नये म्हणून त्या पोत्यात जड दगड भरले आणि ते देवपूर परिसरातील एका निर्जन विहिरीत फेकून दिले. 15 दिवसांनंतर हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत बाहेर काढण्यात आला आहे.

advertisement

आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर 

निफाड पोलिसांनी आरोपी अरुण ढेपले याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून  देवपूर परिसरात शोककळा पसरली आहे.  या प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण आहे.

advertisement

हे ही वाचा :

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी सोडली अन् अगरबत्तीची उभारली कंपनी, 2 भावांच्या जिद्दीची कहाणी
सर्व पहा

पाण्यात गुंगीचे औषध घालून 50 वर्षीय चुलत्याचे पुतणीवर अत्याचार; लग्नाच्या पंधरा दिवसातच समोर आलं धक्कादायक वास्तव; बीड हादरलं

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
ज्याला जीव लावला त्यानेच पोत्यात भरलं अन्....नाशिकच्या नर्सची मर्डर मिस्ट्री उलगडली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल