TRENDING:

Nashik Traffic: पालकांनो अन्यथा जेलवारी! अल्पवयीन मुलांसाठी केला नवा आरटीओ नियम

Last Updated:

नाशिकमध्ये वाहतुक पोलिसांकडून अल्पवयीन मुलांच्या आई- वडीलांना वाहतूक सुरक्षितता आणि महिलांच्या कायद्यावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पालकांना अल्पवयीन मुलांच्या हाती जर वाहन दिलं तर काय शिक्षा होईल? याची माहिती देण्यात आली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिक: नाशिकमधील एका शाळेतर्फे पालकांना वाहतूक सुरक्षितता आणि महिलांच्या कायद्यावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पालकांना अल्पवयीन मुलांच्या हाती जर वाहन दिलं तर काय शिक्षा होईल? याची माहिती देण्यात आली. शाळकरी मुलांच्या हातात वाहन दिल्यास पालकांना दंड होणार, अशी माहितीच वाहतूक पोलीसांनी पालकांना दिली. अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देण्याचे आणि त्यांच्याकडून अपघात होण्याचे प्रमाण वाढत असताना शाळेने पालकांना महत्त्वाचे याबाबतचे महत्त्वाचे नियम सांगितले.
News18
News18
advertisement

दरम्यान, अल्पवयीन मुलांना टु व्हिलर किंवा फोर व्हिलर वाहनं चालवायला देणे हा गंभीर गुन्हा आहे. या प्रकरणी आई- वडीलांना 25 हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात येतो. शिवाय, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते, असा इशाराही वाहतूक पोलीस सचिन जाधव यांनी पालकांना दिला. सिग्नलवर बसवण्यात आलेल्या एआय कॅमेऱ्यांमुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर काटेकोर कारवाई होत असल्याचे नमूद केले. महाराष्ट्रामध्ये अल्पवयीन मुलांकडून मोठ्याप्रमाणावर अपघाताचे प्रमाण वाढत आहे. या सर्वांवर आळा घालण्यासाठी नाशिकच्या वाहतूक पोलिसांनी थेट शाळेतच जाऊन नागरिकांना मोलाचा मंत्र दिला आहे.

advertisement

'वाहतूक सुरक्षितता आणि महिलांचे कायदे' या विषयावर नाशिकमधील डे- केअर सेंटर प्राथमिक शाळेमध्ये पालक सभा भरवण्यात आली होती. यावेळी पालक, शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापकही उपस्थित होते. वाहन चालविताना लायसन्स, आरसी बुक, पीयूसी आणि इन्शुरन्स ही कागदपत्रे सोबत ठेवणे ही गोष्ट बंधनकारक असल्याचे त्यांनी पालकांसमोर स्पष्ट केले. अनेक पालक आपल्या पाल्यांसाठी स्पेशल व्हॅन लावतात. त्यांच्यासाठी ही आरटीओ पोलिसांनी महत्त्वाच्या त्रुटी दिलेल्या आहेत. शाळेच्या व्हॅनचा रंग पिवळा असावा, ड्रायव्हरकडे लायसन्स असावं. त्याने ड्रायव्हरचा युनिफॉर्म परिधान केलेला असावा आणि त्याला कोणतेही व्यसन नसावे, याची खात्री पालकांनी करावी, अशा त्रुटी पोलिसांनी पालकांना सांगितल्या.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूचे दरात पुन्हा तेजी, कांद्या आणि केळीला काय मिळाला आज भाव? इथं चेक करा
सर्व पहा

शाळेच्या व्हॅनमध्ये एकाचवेळी 17 विद्यार्थ्यांनाच बसवण्याचीच परवानगी आहे, मुला- मुलींना वेगळं बसवावं, विद्यार्थी गाडीमध्ये असताना मोठ्या आवाजात गाणी लावू नये. तर, यावेळी वाहतूक पोलिसांकडून इयत्ता सातवीच्या पाच विद्यार्थ्यांना सुरक्षारक्षकाचा बॅच देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये सुरक्षितता जागरूक वाढवण्यासाठी मदत होणार आहे. महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने 112 हा हेल्पलाइन क्रमांक महत्त्वाचा असून, अवघ्या काही मिनिटांत मदत उपलब्ध होते. तसेच 9923323311 या व्हॉट्सॲप क्रमांकावर तक्रार, फोटो किंवा मेसेजच्या माध्यमातून पाठवूनही मदतकर्त्याला मदत मिळू शकते.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik Traffic: पालकांनो अन्यथा जेलवारी! अल्पवयीन मुलांसाठी केला नवा आरटीओ नियम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल