TRENDING:

मध्यरात्री नाशिकमध्ये भीषण अपघात, कार विहिरीत कोसळली, 9 जणांचा करुण अंत

Last Updated:

Dindori Accident News: नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी शहरात शुक्रवारी रात्री एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Dindori Accident News: नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी शहरात शुक्रवारी रात्री एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. शिवाजीनगर परिसरातील राजू राजे यांच्या शेतातील विहिरीत एक कार (एमएच १५ जेएस १०५३) अनियंत्रित होऊन कोसळली. या दुर्दैवी अपघातात कारमधील नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण दिंडोरी तालुका आणि इंदोरे गावात शोककळा पसरली आहे.
nashik news
nashik news
advertisement

नेमकी घटना कशी घडली?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास ही कार दिंडोरीमार्गे जात असताना शिवाजीनगर भागात अचानक चालकाचे कारवरील नियंत्रण सुटलं. नियंत्रण सुटलेली कार थेट रस्त्याशेजारील राजू राजे यांच्या शेतातील विहिरीत जाऊन कोसळली. विहीर उघडी असल्याने कार थेट खोल पाण्यात जाऊन कोसळली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता.

advertisement

बचाव कार्यात मोठे अडथळे

रात्रीची वेळ, विहिरीतील खोल पाणी आणि चिखल यामुळे बचाव कार्यात मोठ्या अडचणी येत होत्या. दाट अंधारामुळे मृतदेह शोधणे आणि कार बाहेर काढण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं. अखेर, रात्री उशिरा क्रेन आणि हायड्रा मशीन पाचारण करण्यात आलं. या यंत्रांच्या मदतीने अथक प्रयत्नानंतर कार विहिरीतून बाहेर काढण्यात यश आलं. मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास सर्व ९ ही मृतदेह बाहेर काढण्यात आले.

advertisement

एकाच कुटुंबातील ५ जण दगावले

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कृषी मार्केटमध्ये मोठी उलथापालथ, केळी आणि कांद्याला कवडीमोल भाव, लिंबाची काय स्थिती?
सर्व पहा

या भीषण अपघातात मृत्यू झालेले सर्व जण दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गावचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील ५ सदस्यांचा समावेश असून सुनील दत्तू दरगोडे, राखी सुनील दरगोडे, उषा अनिल दरगोडे, श्रद्धा अनिल दरगोडे आणि श्रावणी अनिल दरगोडे अशी मृतांची नावं आहेत. यातील इतर ४ मृतांची ओळख अद्याप पटलेली नसून पोलीस प्रशासनाकडून अधिक तपास सुरू आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, इंदोरे गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
मध्यरात्री नाशिकमध्ये भीषण अपघात, कार विहिरीत कोसळली, 9 जणांचा करुण अंत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल