TRENDING:

Nashik News: त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये दलालांचा सुळसुळाट, दर्शनाच्या नावाखाली भाविकांची लूट

Last Updated:

त्र्यंबकेश्वरच्या ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये दलालांचा सुळसुळाट झाला आहे. हे दलाल भाविकांना जलद दर्शन देतो, या नावाखाली हजारो रूपये घेतात. भाविकांच्या लूटीचा प्रकार सध्या सोशल मीडियावर कमालीचा चर्चेत आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिक: त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदीर कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहते. सलग सुट्टी असली की, मंदिरामध्ये दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी पाहायला मिळते. गर्दी म्हटल्यावर भाविकांना रांगेमध्ये उभं राहूनच दर्शन करावे लागते. एवढ्या लांबच लांब रांगेमध्ये उभं राहून दर्शन करण्याऐवजी काही पैसे देऊन पटकन दर्शन होईल, या लालसे पोटी दलालांना हजारो रूपये देतात. पण ते पैसे देऊनही भाविकांचे दर्शन होत नाही. सध्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणावर भाविकांची लूट होत आहे.
News18
News18
advertisement

लवकरात लवकर दर्शन मिळावं, यासाठी एजंट भाविकांकडून हजारो रूपये घेतात. मंदिराजवळ गेल्यानंतर गेटवर थांबवून जोडीदाराला बोलावून आणतो, असं म्हणत ती व्यक्तीने तिथून पळ काढला. तो व्यक्ती पुन्हा त्या ठिकाणी येतच नाही. ज्या व्यक्तीसोबत हा प्रकार घडल्यानंतर त्याला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. त्याने लगेचच आरडा ओरडा सुरू केला. त्याच्या सोबत घडलेली घटना एका व्यक्तीने शूट केली. हा शूट केलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेचा व्हिडिओ एका भाविकाने व्हायरल केला आहे.

advertisement

दरम्यान, दोनशे रूपये देणगी दर्शनाचा पास काढूनही भाविकांना तासंतास दर्शनासाठी रांगेमध्ये उभं राहावं लागतं. "वारंवार मंदिर ट्रस्टकडून भाविकांनी दर्शनाच्या नावाखाली दलालांकडून केल्या जाणाऱ्या अमिषाला बळी न पडण्याचे आवाहन केले जाते. तरीही अनेक भाविक दलालांना पैसे देऊन दर्शन करतात. पण त्यामुळे अनेकदा त्यांची फसवणूक होते." अशी प्रतिक्रिया मंदिराच्या विश्वास्तांनी दिली आहे. सुट्टीच्या दिवसांमध्ये त्र्यंबकेश्वरच्या ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये, मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होते. त्यामुळे सुट्टीच्या दिवसांमध्ये दलाल भाविकांकडून मोठ्या प्रमाणावर पैशांची लूट करत असतात.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
महिलांसाठी 5 बेस्ट कमी खर्चातले बिझनेस, घरातूनच करा सुरुवात, कमाईचा बेस्ट ऑप्शन Video
सर्व पहा

मंदिराच्या विश्वास्तांनी भाविकांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. ते म्हणाले की, " भाविकांच्या दृष्टीने आम्ही महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भाविकांचं जलद दर्शन व्हावं यासाठी देवस्थान ट्रस्टकडूनच 2500 रूपये घेऊन 'जलद दर्शन'ची व्यवस्था करण्यात येणार आहे. या व्यवस्थेसाठी मंदिर ट्रस्ट फक्त विचारात आहे, अद्याप निर्णय घेतलेला नाही." भाविकांकडून लवकर दर्शन करून देतो, असं सांगून दलालांकडून होणारी लूट ही काही आत्ताची नाही. यापूर्वीही या घटना अनेकदा घडल्या आहेत. मंदिर देवस्थान ट्रस्टकडे या घटनेची माहिती आली असतानाही मंदिर प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik News: त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये दलालांचा सुळसुळाट, दर्शनाच्या नावाखाली भाविकांची लूट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल